पुणे अन् मुंबईला दररोज पाणीपुरवठा, पण इतर महाराष्ट्रात पाण्याची गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 07:18 AM2022-05-22T07:18:29+5:302022-05-22T07:19:28+5:30

मुंबई, कोकण कोणत्या शहरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा?

Daily water supply to Pune and Mumbai, water supply to other parts of Maharashtra | पुणे अन् मुंबईला दररोज पाणीपुरवठा, पण इतर महाराष्ट्रात पाण्याची गंभीर समस्या

पुणे अन् मुंबईला दररोज पाणीपुरवठा, पण इतर महाराष्ट्रात पाण्याची गंभीर समस्या

Next

मुंबई - तुमचा विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरे अशी आहेत, ज्यांना महिन्यातून फक्त तीन किंवा चारदा पाणीपुरवठा होतो. म्हणजे या शहरांतील नळांना दहा-अकरा दिवसांतून एकदाच पाणी येते.

मुंबई, कोकण कोणत्या शहरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा?

मुंबई : मुंबईकरांना दररोज पाणीपुरवठा.
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्गला दररोज पाणीपुरवठा.
दररोज  : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
n तीन ते पाच दिवसांनी : सोलापूर.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : शहराला दररोज सकाळ-सायंकाळ दोन तास पाणीपुरवठा.

कोल्हापूर : दररोज कमीत कमी चार व जास्तीत जास्त वीस तास पाणीपुरवठा.

सातारा : आठवड्यातून एक दिवस कपात. काही भागात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा.

सांगली : रोज कमीत कमी एक ते जास्तीत जास्त तीन तास पाणीपुरवठा.

सोलापूर : ४ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. अंतर्गत पाइपलाईन कालबाह्य झाल्या आहेत. पंपगृहाचा वीज पुरवठा अनेकदा खंडीत होतो. तज्ज्ञ अधिकाऱ्यांची कमतरता आहे.

मराठवाडा

औरंगाबाद : शहरात सहाव्या-सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. जायकवाडी धरण आणि हर्सूल तलावातून पाणी येते. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांकडे जास्त पाणी आणण्याची क्षमता नाही. १३० एमएलडी पाणी येते. गरज २०० एमएलडी आहे. अनधिकृत नळ ही मोठी डोकेदुखी.
नांदेड : मुबलक जलसाठा, पाणीही आरक्षित, पण महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंत्रणा अपुरी.
बीड : अमृत योजना अपूर्ण, अनधिकृत नळ कनेक्शन, जुनी पाईपलाईन, पालिकेचे ढिसाळ नियोजन.
जालना : अंतर्गत पाणीपुरवठा योजना रखडली.
लातूर : वितरण व्यवस्थेत दोष, जलवाहिनीतून गळती.
उस्मानाबाद : रोज १० एमएलडी पाण्याची तूट. नियोजन ढेपाळलेले.
परभणी : वितरणाचे ढिसाळ नियोजन.
हिंगोली : तूट वाढू नये म्हणून दोन दिवसांआड पाणी.

विदर्भ

खामगाव : १० ते ११ दिवसांपर्यत पाणीपुरवठा लांबणीवर पडतो. पाइपलाइन जुनी असल्यामुळे वारंवार बिघाड. वाढीव पाणीपुरवठा योजना १३ वर्षांपासून थंड बस्त्यात.
चंद्रपूर : अमृत नळयोजनेची कामे अपूर्ण.
नागपूर : शहरालगतच्या नेटवर्क नसलेल्या भागाला टँकरने पाणीपुरवठा.
वर्धा : रोज पाणी देण्यात तांत्रिक अडचणी.
यवतमाळ : मजिप्राच्या नियोजनाच्या अभावामुळे दररोज पाणी मिळत नाही. अमृत योजना पूर्णत्वाच्या मार्गावर.
भंडारा : अधूनमधून अशुद्ध पाणी पुरवठा. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षांपासून संथगतीने. जुन्या पाईपलाईनमुळे गळती.
गोंदिया : वैनगंगा नदीचेे पात्र कोरडे पडल्यानंतर उन्हाळ्यात पुरवठ्याची समस्या निर्माण होते.
अकाेला : मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकाळी परिसरात अवैध जोडण्या. ३० टक्के पाणी गळतीमुळे वाया.
अमरावती : ५५ किलोमीटर अंतरावरील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून येते पाणी.
गडचिराेली : पाणी वाटपाचे नियाेजन नसल्याने असमताेल पुरवठा.
बुलडाणा : शहर पाणीपुरवठा योजनेचा डिझाईन कालावधी संपल्यामुळे दररोज पाणीपुरवठा शक्य नाही.
वाशिम : शहराला 
वर्षभर दाेन दिवसाआड व उन्हाळ्यात मार्चपासून मे शेवटपर्यंत ५ ते ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाताे.

Web Title: Daily water supply to Pune and Mumbai, water supply to other parts of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.