दलाई लामा, बाबा रामदेव एकत्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:43 AM2017-08-12T06:43:08+5:302017-08-12T06:43:08+5:30

हिंसा आणि युद्धाने जगात फक्त तिरस्कारच वाढेल. जर जगात शांती प्रस्थापित करायची असेल तर सर्व धर्मगुरूंनी व समाजातील प्रतिष्ठितांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन जैन गुरू आणि अहिंसा विश्व भारती या संस्थेचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी केले.

 Dalai Lama, Baba Ramdev together | दलाई लामा, बाबा रामदेव एकत्र  

दलाई लामा, बाबा रामदेव एकत्र  

Next

मुंबई : हिंसा आणि युद्धाने जगात फक्त तिरस्कारच वाढेल. जर जगात शांती प्रस्थापित करायची असेल तर सर्व धर्मगुरूंनी व समाजातील प्रतिष्ठितांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन जैन गुरू आणि अहिंसा विश्व भारती या संस्थेचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी केले. विश्वशांतीसाठी तिबेटियन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आणि योगगुरू बाबा रामदेव हे दोघे एकत्र काम करणार आहेत, असेही आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा आणि भाजपा नेते कवीन शाह उपस्थित होते. विविध धर्मगुरूंना आणि समाजातील प्रतिष्ठितांना एकत्र येऊन चर्चा करता यावी यासाठी अहिंसा विश्व भारती या संस्थेतर्फे जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत ‘विविधतेत एकता - भारतीय संस्कृती’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिषदेत तिबेटियन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, अहिंसा विश्व भारती या संस्थेचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, जैन आचार्य कुलचंद्र विजय महाराज, नम्रमुनी महाराज, साध्वी मयनाश्रीजी, अकाल तख्तचे प्रमुख जत्थेदार ग्यानी गुरबचन सिंग, आॅल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डचे उपाध्यक्ष डॉ. कल्बे सादिक, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री महेश शर्मा सहभागी होणार आहेत.
१३ आॅगस्टला वरळी येथील एन.एस.सी.आय. (नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया) डोम येथे सकाळी १० वाजता ही परिषद होईल, असे आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले.

बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने परिषदेला पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही बॉलीवूडचे अभिनेते फक्त पडद्यावरचे हीरो आहोत; मात्र आचार्य डॉ. लोकेश मुनी हे खरे अ‍ॅक्शन हीरो आहेत, असेही विवेकने सांगितले.

स्वातंत्र्य दिनापूर्वी आम्ही शांतता परिषदेचे आयोजन करत आहोत. भारतासह चीन, अमेरिका आणि अनेक आशियाई व अमेरिकन देशांचे या परिषदेकडे लक्ष लागले आहे. शांततेसाठी विविध धर्मांचे धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. विविध राज्यांचे नेते एकत्र येऊन देश चालवतात तसेच आम्ही धर्मगुरू एकत्र येऊन समाज चालवू शकतो. समाजात आणि जगात शांतता प्रस्थापित करू शकतो.
- आचार्य डॉ. लोकेश मुनी

Web Title:  Dalai Lama, Baba Ramdev together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.