कुलाबा बंदरात ५२ बोटींचे, राज्यात १५० नौकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:56+5:302021-05-21T04:06:56+5:30

मच्छिमार हवलदिल; आता सामना ओल्या दुष्काळाचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. ...

Damage to 52 boats in Colaba port, 150 boats in the state | कुलाबा बंदरात ५२ बोटींचे, राज्यात १५० नौकांचे नुकसान

कुलाबा बंदरात ५२ बोटींचे, राज्यात १५० नौकांचे नुकसान

Next

मच्छिमार हवलदिल; आता सामना ओल्या दुष्काळाचा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. कुलाबा बंदरात ५२ मच्छिमार बोटींचे, तर राज्यभरात १५० नौकांचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त मच्छिमारांना नुकसानीचे पंचनामा करून त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून तूर्तास ३५ कोटी मदत निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे सुकी मासळी सुकविणाऱ्या मच्छिमार महिलांचे फार मोठे प्रमाणत नुकसान झाले असून प्रत्येक मच्छिमार महिलेला प्रत्येकी किमान पंधरा हजार रुपये देण्याची त्यांची मागणी आहे.

मुंबईच्या ससून डॉक (कुलाबा) बंदरात ५२ मच्छिमार बोटींचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यात मच्छिमारांच्या जाळ्यांचे, इंजिनांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यभरात एकंदरीत १५० नौकांचे नुकसान झाले आहे. तसेच मुंबईतील माहीम बंदरांत दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली. राज्यातील सात सागरी जिल्ह्यात मच्छिमारांच्या राहत्या घरांवर झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांच्या नुकसानभरपाईच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनांकडून पंचनामा करून कमीत-कमी कागदोपत्रे घेऊन त्वरित मदतनिधी वाटप करण्याची विनंती समितीने राज्य सरकारला केली आहे.

-----------------------------------

Web Title: Damage to 52 boats in Colaba port, 150 boats in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.