- स्नेहा मोरे
मुंबई : शहर-उपनगरातील एसटी आगारांपैकी प्रमुख आगार असणाऱ्या मुंबई सेंट्रल येथील आगारातील सुरक्षा यंत्रणेचे ढिसाळ व्यवस्थापन समोर आले आहे. या आगारात ये-जा करणाºया प्रवाशांची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. या आगारात प्रवेशद्वारांजवळ मेटल डिटेक्टर आहे, मात्र ही यंत्रणा बंद आहे. आगारातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद आहे़ शहरातील प्रमुख आगार असूनही एसटी महामंडळ या ठिकाणी मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे.
दोन वर्षांपूर्वी आर्थिक उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधणाºया एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल आगाराची जागा रिकामी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. काही संघटनांनी विरोध केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. या आगारात राज्यभरातून अनेक एसटींची वाहतूक होते. मुंबई सेंट्रल येथील आगारासमोर रेल्वे स्थानकाचा परिसर आहे. जवळच नायर रुग्णालयाचा परिसर आहे. दररोज शेकडो नागरिक येथून ये-जा करत असतात. असे असूनही आगारातील सुरक्षा यंत्रणा सक्षम नाही. आगारात परिवहन मंत्री दिवाकर रावते, महाव्यवस्थापक यांचे कार्यालय आहे, परंतु येथेही सुरक्षा व्यवस्थापनाचा अभाव आहे.
आगारातील शौचालयांमध्येही अस्वच्छता आहे. शौचालयाच्या बाहेर ‘पैसे आकारू नये’ अशी सूचना आहे़ तरीही येथील व्यक्ती राजरोसपणे सेवा वापरणाºया व्यक्तींकडून पैसे घेतात. आगाराच्या इमारतीत गळतीची समस्या आहे़ तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.या कारणास्तव येथील इमारतीच्या परिसरात बांबूंचे टेकू लावले आहेत. इमारतीच्या आवारातही सिमेंट, रेतीचे ढिगारे दिसून येत आहेत. आगारातील डिझेल सेंटर बंद करण्यात आले. वर्षभरापूर्वी बंद होऊनही तेथील उपकरणे आणि काउंटर त्याच स्थितीत आहेत.जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले याने सांगितले की, या आगारात साधारण अडीच हजार कर्मचारी आहेत. राज्यातून आणि राज्याबाहेरून ११०० पेक्षा जास्त बसगाड्यांची ये-जा असते. एसटी आगाराचे रूपडे लवकरच बदलणार आहे़ राज्यभरात एसटी आगारांच्या रंगरंगोटीचे आणि येथील सुुविधा अद्ययावत करण्याचे काम सुुरू आहे. येत्या काळात एसटी आगाराचे रूप बदलेल.विश्रांतीगृहाची दयनीय अवस्थाएसटी आगारात कंडक्टर, चालकांसाठी असणारे विश्रांतीगृह दयनीय अवस्थेत आहे. या ठिकाणीही अत्यंत अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य आहे. शौचालयांचे सांडपाणी बाहेरच्या आवारात आलेले दिसून येत आहे. बेसिनची पाइपलाइन गळत असल्याने विश्रांतीगृहात पाण्याचे डबके दिसून येत आहे. एसटी महामंडळाने रात्रंदिवस मेहनत घेणाºया चालकांसाठी येथील विश्रांतीगृहांची डागडुजी करणे आवश्यक आहे.