मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचे धरणे
By admin | Published: July 4, 2016 09:11 PM2016-07-04T21:11:50+5:302016-07-04T21:11:50+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांत रोजंदारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांनी सोमवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. कंत्राटी कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांत रोजंदारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांनी सोमवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. कंत्राटी कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी आंदोलनकर्त्या
म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी होती. महापालिकेमध्ये घन कचरा व्यवस्थापन रूग्णालये, मलेरिया, रस्ता, दुरूस्ती,
गटारे, मलनि:सारण अशा विविध खात्यांतील बिगर सरकारी संस्था (एनजीओ) आणि कंत्राटदारांकडे कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने काम करणा-या कामगारांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.
स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून जनतेचीसेवा करणाºया कंत्राटी कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. ते म्हणाले की, घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत रस्ते स्वच्छता अभियान, हैद्राबाद पॅटर्न, मॅनिंग मॉपिंग, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान, रूग्णालये, मलेरिया इत्यादी खात्यातील कंत्राटी कामगारांना कायद्यानुसार सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कामगारांना महापालिकेविरोधात आंदोलन करावे लागत आहे.
महापालिकेमार्फत कामगार कायद्याची अंमलबजावणी करताना ४६ टक्के लेव्ही अंतर्गत विविध सुविधा लागू करण्याची मागणीही राव यांनी केली. कामगारांना कंत्राटदार बदलल्यानंतरही कायम ठेवण्यात यावे, शिवाय त्यांना गणवेष, साबण, टॉवेल, रेनकोट, गमबूट असे साहित्यही देण्यात यावे. सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना राज्य शासनाचे किमान वेतन देण्यात यावे. नाहीतर
यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राव यांनी दिला आहे.