Join us

राज्यभरातील धरणे कोरडीच, मराठवाड्यात स्थिती बिकट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 5:54 AM

दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.

मुंबई : दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता.मराठवाड्यातील मोठी धरणे अजून कोरडीच जायकवाडीत, निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पेनगंगा, मनार, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सिना कोळेगाव हे ११ मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत, तर शहागड बंधारा, खडका बंधाऱ्यात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. ७५ मध्यम, तर ७४९ लघुप्रकल्प आहेत. मागील वर्षी ११.१३ टक्के जलसाठा वरील सर्व प्रकल्पांत २३ जूनपर्यंत होता. यावर्षी मात्र ते प्रमाण १ ते सव्वा टक्क्याच्या आसपास आले आहे. जून महिन्यात येलदरी प्रकल्प परिसरात ४३ मि.मी. पावसाची, तर जायकवाडी धरण क्षेत्रात १० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही आठ धरणे पूर्ण रिकामी झाली असून १६ धरणांमध्ये मिळून एकूण फक्त ८.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला प्रणालीतील चार धरणांत ८.४९ टक्के म्हणजे २.४७ टीएमसी पाणीसाठा आहे.पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांतील सात धरणांत जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. यात सर्वात भीषण परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यातील आहे. दरम्यान, वºहाडातील पाच जिल्ह्यांत केवळ १०.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पाच मोठे व १४ मध्यम सिंचन (धरण) प्रकल्प आहेत. यातील बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा धरणात केवळ ६.६६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या जिल्ह्यातील मस, कोरडी व तोरणा मध्यम प्रकल्पांची जलपातळी शून्य टक्के आहे. उर्वरित ज्ञानगंगा धरणात ४.६८ टक्के, पलढग ६.९२ टक्के, मन १२.६५ टक्के तर उतावळी धरणात १६.५७ टक्के जलसाठा आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम पाच टक्के जलसाठा शिल्लक असून, पंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. नाशिक शहरासह मराठवाडा, नगर या जिल्'ांना पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात १५ टक्के पाणी शिल्लक आहे.तसेच पाण्याचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे यंदा ११० टक्के भरलेल्या सोलापूरमधील उजनी धरणाची अवस्था वाळवंटासारखी झाली आहे. उजनीच्या इतिहासात कधी नव्हे ते जलसाठा वजा ५८.६१ टक्क्यांपर्यंत गेला आहे. बोगदा व कालवाकाठची पिके अखेरच्या घटका मोजत आहेत.आरंभीवासीयांची पाण्यासाठी भटकंतीनागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती तसेच डोंगराळ भागात वसलेले आरंभी (ता. नरखेड) पाण्याच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिले आहे. या गावाची लोकसंख्या १,१९७ असून, घरांची संख्या २२७ आहे. एक हजार फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदली तरी येथे पाणी लागत नाही. गावात दोन सार्वजनिक, तर ४७ खासगी विहिरी आहेत. परंतु, या सर्व विहिरी कोरड्या आहेत. सध्या सरपंच नरेश गोरे यांच्या शेतातील विहिरीतून गावाला थोडाफार पाणीपुरवठा केला जात आहे. त्या विहिरींमधील पाणी गावातील मोठ्या हौदात सोडले जाते आणि ग्रामस्थ त्यातील पाणी गुंड किंवा बादलीने नेतात.

टॅग्स :दुष्काळमहाराष्ट्र