Join us

दामूनगर आगीमागे बिल्डर लॉबी; काँगे्रसचा आरोप

By admin | Published: December 22, 2015 1:54 AM

दामूनगर येथील अग्निकांडातील पीडितांना सरकारकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. बाधित रहिवाशांना किमान ५० हजार रुपयांची मदत, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजची फी माफ करण्यात यावी,

मुंबई : दामूनगर येथील अग्निकांडातील पीडितांना सरकारकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. बाधित रहिवाशांना किमान ५० हजार रुपयांची मदत, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजची फी माफ करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसने शनिवारी साखळी उपोषण केले.राज्य सरकारच्या अनास्थेमुळे लोकांवर उपोषणाची वेळ आली असल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, सुरुवातीला ही आग अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, ज्या पद्धतीने येथील रहिवाशांना हटविण्याचा प्रयत्न होत आहे ते पाहता आगीमागे सत्ताधारी आणि बिल्डर लॉबीचे कारस्थान असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आग्निकांडापूर्वीच स्थानिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत होता. झोपडपट्टीची जमीन वन विभागाची असल्याचा दावा करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र ही जागा गोरक्ष सेवा मंडळाची असल्याचे समोर आले आहे. येथील लोकांना इथून पळवून लावावे आणि नंतर ही जमीन बिल्डरांच्या घशात घालावी ही सरकारची खेळी आहे. स्थानिकांचे राहत्या जागी पुनर्वसन, किमान ५० हजारांची आर्थिक मदत आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी पूर्ण होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही निरुपम यांनी या वेळी दिला. निरुपम यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी आमदार, नेते आणि पदाधिकारीही साखळी उपोषणात सहभागी झाले.