Join us

डान्स बारचा नाद रोमानियनांना भोवला

By admin | Published: October 07, 2015 2:37 AM

एटीएम डाटा चोरी, त्यातून मिळालेले पैसे डान्स बारमधील बार गर्ल्सवर उडविणे रोमानियनांना भोवल्याचे तपासातून उघड होत आहे. बार गर्ल्सच्या मदतीने पोलिसांना

- मनीषा म्हात्रे,  मुंबईएटीएम डाटा चोरी, त्यातून मिळालेले पैसे डान्स बारमधील बार गर्ल्सवर उडविणे रोमानियनांना भोवल्याचे तपासातून उघड होत आहे. बार गर्ल्सच्या मदतीने पोलिसांना या रोमानियनांचा प्रताप उघड करण्यास मदत झाली. चोरीचे पैसे देशाबाहेर नेणे कठीण असल्याने या पैशातून हिरे आणि सोन्याचे दागिने खरेदी करून ही रोमानियन स्किमर टोळी रोमला रवाना होणार होती अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.मूळचे रोम येथील अलीन बुडोई (३१), मारियन ग्रामा (४२), म्यु आयोनेल (४२) अशी रोमानियन टोळीतील अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशात स्किमर मशिनद्वारे चोरी करण्याचा प्रयत्न सफल झाल्यानंतर त्यांनी मुंबईत मोर्चा वळविला. या त्रिकूटाला ऐशआरामाच्या जीवनाबरोबर डान्स बारचा नाद जडला होता. रात्रीच्या सुमारास अंधेरी येथील गुड्डी डान्स बार हा त्यांचा नेहमीचा अड्डा होता. एटीएम डाटा चोरी करून त्यातून मिळालेले लाखो रुपये ते या डान्सबारमध्ये उडवत होते. येथीलच दोन बार गर्ल्स त्यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्याशी त्यांचे रोजचे बोलणे सुरू असायचे. वांद्रे येथील युनियन बँकेच्या एटीएम सेंटरच्या सीसीटीव्हीमध्ये अलीन बुडोईची शॉपिंग पिशवी कैद झाली. त्याआधारे बुडोईचा मोबाइल नंबर पोलिसांनी लॉयल्टी कार्डच्या आधारे मिळवला. मोबाइल क्रमांकाच्या तपशिलामध्ये दोन महिलांच्या क्रमांकांवर जास्तीचे फोन झाल्याने पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात रोमानियन्सचा डान्स बारचा नाद समोर आला. या बार गर्ल्सच्या आधारे पोलिसांना दलाल खिमजा याचा मोबाइल क्रमांकदेखील हाती लागला. त्याच्या मोबाइल सिम कार्डच्या रजिस्टे्रशनमध्ये पत्ता वांद्रे येथील होता. पोलिसांचे पथक खिमजाच्या घरी धडकले. मात्र त्या ठिकाणी खिमजा राहत नसून त्याचे आई-वडील राहत होते. चौकशीत खिमजा मालाड परिसरात राहत असल्याचे समजले. तोपर्यंत विनोबा भावे नगर पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने मालाड येथील घरातून खिमजाला उचलले. त्याच्या चौकशीतून आरोपी रोमानियन्सना वांद्रे येथील पाली नाका परिसरातील फातिमा हाउसमधून अटक केली. ५० हजार रुपये भाडेतत्त्वावर हे त्रिकूट तेथे राहत होते. त्याच्या दोन तासांनी आरोपींचा मागोवा घेत गुन्हे शाखेचे अधिकारीही खिमजाच्या घरी पोहोचले. मात्र तोपर्यंत विनोबा भावे नगर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. इंटरनेट कॉलिंगवर भरहे रोमानियन त्रिकूट सहसा मोबाइलवर बोलणे टाळत होते. यासाठी ते इंटरनेट कॉलिंगमार्फत संवाद साधत होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.स्किमर मशिन स्वत: बनविलेस्किमर टोळीतील मुख्य सूत्रधार असलेल्या अलिन बुडोई याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आवड होती. त्याने स्किमर मशिन, स्पाय कॅमेरा, प्लॅस्टिक इलेक्ट्रिक केसिंग स्वत: घरी तयार केले होते. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमधील मशिन स्लॉटच्या आकाराची तो माहिती घेत असे. त्यानंतर त्या आकाराची स्पाय कॅमेरा असलेली प्लॅस्टिक स्ट्रीप तयार करून त्या एटीएमला बसवत असे. काय होते प्रकरणवांद्रे येथील रहिवासी असलेल्या कॅन्डिस पॉल फर्नांडिस यांचे कॅथलिक सीरियन बँकेमध्ये खाते आहे. १४ सप्टेंबर रोजी त्यांचा खात्यातून पैसे काढल्याच्या मोबाइलवर आलेल्या एसएमएसनंतर महिलेने विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रोमानियन त्रिकूटाचा पर्दाफाश केला. रात्रीच्या अंधारात अदलाबदलरात्रीच्या वेळी या रोमानियन टोळीचे काम सुरू व्हायचे. रात्रीच्या सुमारास एटीएम सेंटरची रेकी करायचे आणि पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून सायंकाळच्या सुमारास ते स्किमर काढत असत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मुंबईच्या विविध डान्स बारमध्ये जाणे असा त्यांचा दिनक्रम त्यांच्या कॉल्स लोकेशनच्या तपाशिलातून समोर आला.वांद्रे पोलीस ठाण्यात ५०हून अधिक तक्रारीवांद्रे पोलीस ठाण्यात अशा स्वरूपाच्या ५०हून अधिक तक्रारी समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या टोळीने याच परिसरातील युनियन बँकेचे एटीएम सेंटर निवडल्याने येथील तक्रारी अधिक आहेत. कांदिवली, दहिसर, सांताक्रुझमधील तक्रारदारही पुढे येत आहेत.