इमानला करायचाय हृतिकसोबत डान्स!

By admin | Published: February 23, 2017 04:28 AM2017-02-23T04:28:52+5:302017-02-23T04:28:52+5:30

इमानला दहा लाख रुपयांची मदत केल्यानंतर नुकतेच बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनच्या

Dancing with Hrithik to do faith! | इमानला करायचाय हृतिकसोबत डान्स!

इमानला करायचाय हृतिकसोबत डान्स!

Next

मुंबई : इमानला दहा लाख रुपयांची मदत केल्यानंतर नुकतेच बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनच्या आई व बहिणीने तिची सैफी रुग्णालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान, इमानने हृतिकच्या आईकडे हृतिकसोबत डान्स करायची इच्छा व्यक्त केली आहे.शिवाय, इमानचा आवडता अभिनेता सलमान खानही लवकरच तिची भेट घेणार असल्याचे कळले आहे.
हृतिकच्या आईच्या भेटीत इमानने आपल्याला हृतिकचा अभिनय आणि डान्स आवडल्याचे आर्वजून सांगितले.शिवाय, इमानला उभे राहता आल्यानंतर तिला हृतिकसोबत डान्स करायचा असल्याची इमानची इच्छा तिची बहिण शायमा अहमद यांनी व्यक्त केली. तर इमान भारतात दाखल होणार आहे, असे कळल्यापासून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होतो, इमानसारख्या व्यक्तींसोबत आपण उभे राहिले पाहिजे, अशी भावना हृतिकच्या आईने व्यक्त केली. इजिप्तहून वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत दाखल झालेल्या जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमद हीचे ५०० किलो वजन आहे. मुंबईत चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिने काहीच दिवसांत ३० किलो वजन घटविले आहे. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या उपचारांसाठी ‘बिटगिव्हींग’ या साइट्सच्या माध्यमातून क्राऊडफंडिगद्वारे निधी उभारण्यात येत आहे. याकरिता, १ कोटींचा निधी लागणार असून आतापर्यंत १९ लाख ४१ हजार ५२ रुपये जमा झाले आहेत. तर १० लाख रुपयांची मदत हृतिकची आई पिंकी आणि बहिण सुनैना यांनी केली आहे.
इमानला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक आजार आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.  येत्या ४-५ महिन्यांत इमानचे १०० किलो वजन घटविण्याचा निर्धार डॉक्टरांनी केला आहे. सध्या इमानवर उपचारांसाठी १३ जणांच्या डॉक्टरांचा चमू आणि ८ सदस्य दैनंदिन काळजी घेत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Dancing with Hrithik to do faith!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.