पालिकेला चुना लावणा-या अधिका-यांना निवृत्तीनंतर दंंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:29 AM2018-03-13T06:29:48+5:302018-03-13T06:29:48+5:30

आयकर वेळेत न भरल्यामुळे महापालिकेला २०१६ मध्ये एक कोटी १४ लाख ७४ हजार रुपये दंड भरावा लागला होता. या निष्काळजीसाठी जबाबदार अधिका-यांना मात्र पाच ते दहा हजार रुपये दंड करण्याची शिफारस चौकशी समितीने दिला होती.

Dandakaranya after retirement from the Municipal Corporation | पालिकेला चुना लावणा-या अधिका-यांना निवृत्तीनंतर दंंड

पालिकेला चुना लावणा-या अधिका-यांना निवृत्तीनंतर दंंड

Next

मुंबई : आयकर वेळेत न भरल्यामुळे महापालिकेला २०१६ मध्ये एक कोटी १४ लाख ७४ हजार रुपये दंड भरावा लागला होता. या निष्काळजीसाठी जबाबदार अधिका-यांना मात्र पाच ते दहा हजार रुपये दंड करण्याची शिफारस चौकशी समितीने दिला होती. यावर सर्व पक्षीय नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर या दंडाच्या रक्कमेत बदल करीत दोन्ही अधिकाºयांना प्रत्येकी २५ लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. यापूर्वी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर यांना २५ लाख रुपये दंड करण्यात आला होता.
अधिकाºयांच्या निष्काळजीमुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र चौकशीनंतर अशा अधिकाºयांवर थातूरमातूर कारवाई होत असल्याने अन्य अधिकारी-कर्मचाºयांना घोटाळ्यासाठी प्रोत्साहनच मिळत आहे. यामुळे अशा अधिकºयांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे. अखेर स्थायी समितीनेच यात हस्तक्षेप करीत या निवृत्त अधिकाºयांना प्रत्येकी २५ लाख रुपये दंड केला आहे.
असे होते प्रकरण
आयकर विभागाकडून कलम २०० ए, आयकर अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिकेकडे मागणीपत्राद्वारे आयकराच्या भरणा करण्यास सांगूनही विलंब झाल्याप्रकरणी व्याजासह एक कोटी १४ लाख ७४ हजार रुपयांची दंडात्मक रक्कम महापालिकेला भरावी लागली होती.
>यामुळे केला दंड
तत्कालिन व्यवस्थापक (आधार सामग्री संस्कारण केंद्र) रवींद्र आचार्य आणि प्रमुख लेखापाल (कोषागार) नंदकुमार राणे यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये ते दोषी आढळून आल्याने आचार्य यांना एकरक्कमी दहा हजार रुपये तर राणे यांना पाच हजार रुपये त्यांच्या निवृत्ती वेतनातून कापण्याची शिक्षा चौकशी समितीने सुनावली होती.

Web Title: Dandakaranya after retirement from the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.