पहिल्याच दिवशी पालिकेत दांडी !

By admin | Published: January 2, 2015 12:36 AM2015-01-02T00:36:39+5:302015-01-02T00:36:39+5:30

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर्मचारी-अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांनी चक्क दांडी मारीत पालिकेच्या सुस्त कारभाराची ओळख करून दिली़

Dandi in the first day! | पहिल्याच दिवशी पालिकेत दांडी !

पहिल्याच दिवशी पालिकेत दांडी !

Next

मुंबई : नववर्षाच्या स्वागतात संपूर्ण रात्रभर मुंबई झिंगली़ पण दुसऱ्याच दिवशी त्याच जोमाने सर्व कामालाही लागले़ मात्र महापालिकेचा हँगओव्हर अद्याप उतरलेला नाही़ म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कर्मचारी-अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांनी चक्क दांडी मारीत पालिकेच्या सुस्त कारभाराची ओळख करून दिली़
केंद्र व राज्यात स्थापन झालेल्या राज्य सरकारचे हे पहिलेच वर्ष़ त्यामुळे नवीन पदाचा भार स्वीकारत मंत्र्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले़ मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पसरलेला सुटीचा मूड काही सरकारी कार्यालयांतून पाय काढण्याचे नाव घेत नाही़ असेच काहीसे चित्र मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज दिसून आले़
आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष यांची कार्यालये पालिका मुख्यालयात आहेत़ त्यांना भेटण्यासाठी दररोज शेकडो नागरिक, नेते, कार्यकर्ते येत असतात़ मात्र आयुक्त सीताराम कुंटे यांना वगळता अधिकारीवर्गांमध्ये अनेक जण मुख्यालयात आज फिरकलेच नाहीत़ तर राजकीय पक्षांमध्ये सभागृह नेत्या तेवढ्या दोन तास आल्या होत्या़ (प्रतिनिधी)

राजकीय नेत्यांमध्ये सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव या दोन तासांसाठी महापालिकेत होत्या़ बाकी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष दुपारपर्यंत दिसून आले नाहीत़
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त सीताराम कुंटे मुख्यालयात होते़ अतिरिक्त आयुक्तांमध्ये विकास खारगे यांची बदली होत असल्याने त्यांचे कार्यालये रिकामीच होते़ दुसरे अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आर श्रीनिवास हे दुपारी २ नंतर पाहणीला निघून गेले़ तर संजय देशमुख दुपारनंतर मुख्यालयात दिसले़
नेहमी गजबलेल्या पालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्येही आज कधी नव्हे तो शुकशुकाट दिसून आला़

Web Title: Dandi in the first day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.