हितेन नाईक ल्ल पालघरझपाट्याने वाढत असलेले औद्योगिकरण आणि प्रक्रिया न केलेले प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जात असल्याने दांडी ते वडराईचा समुद्र किनारा प्रदूषित झाला असून या प्रदूषणामुळे सागरी जैवविविधता आणि मासेमारीवर मोठा विपरीत परिणाम होत असल्याचा अहवाल केंद्र शासनाच्या समुद्र विज्ञान संस्थेने व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सादर केला आहे. तरीही तारापूरच्या एमआयडीसी सामूहिकरित्या सांडपाणी केंद्राची ११३ कोटी रुपये योजनेची पाइपलाईन नवापूर गावातून साडे सात किमी समुद्रात टाकण्याची परवानगी नवापूर ग्रामपंचायतीने दिली आहे. या पोटी ४० लाखाचा ग्रामविकास निधी नवापूर गावाला मिळणार असून या प्रकल्पामुळे मच्छिमारीवर मोठा विपरीत परिणाम होणार असल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न मच्छीमार विचारत असून याविरोधात एकही सहकारी संस्था, संघटना याचा विरोधात उभी रहात नसल्याने मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधीक प्रदूषित आहे असा ठपका केंद्र शासनाचा समुद्री विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीसीली) यांनी एकत्रिीतरित्या अहवालाद्वारे दिलेला आहे. झपाट्याने वाढलेले औद्योगिकरण, शहरीकरण आणि कोणत्याही प्रक्रियेविना पाण्यात थेट सोडण्यात येणारे रासायनिक प्रदूषित घटक याला सर्वस्वी जबाबदार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या प्रदूषणामुळे सागरी जैवविविधता आणि मासेमारीवरही परिणाम झाल्याचे नमूद करीत तारापूरमधील समुद्र ऊर्जा प्रकल्प व प्रदूषित सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्याचे म्हटले आहे.पालघर तालुक्यातील उच्छेळी, दांडी, नवापूर, आळेवाडी, मुरसे, खारेकुरण, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम इत्यादी समुद्र किनाऱ्यावरील खाडी, समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तारापूर औद्योगिक वसाह, सिडको औद्योगिक वसाहत, पालघरमधील कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले प्रदषित पाणी थेट सोडले जात असल्याने प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात खाडीतील मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून येत आहेत. त्या विरोधात मोर्चे, आंदोलन करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूरच्या अधिकाऱ्यावर याचा कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे खाडीतील मासे संपुष्टात आले असून खाडीतील मासेमारीवर अवलंबून असणारी शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.या प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईनमुळे मासेमारी व्यवसायासह आमचा आरोग्यावरही दुष्परिणाम होणार असल्याने आम्ही ही पाईपलाईन गावामधून जाऊ देणार नाही.’’- अधिराज किणी, अध्यक्ष - मांगेला समाज, नवापूरजुनाट पाईपलाईन बदलण्याचे काम कायमस्वरुपी बंद होणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. लोकांना वाटत असेल तर विकास निधी परत देऊ.’’- अंजली बारी, सरपंच, नवापूर४नवापूरच्या समोरील समुद्रकिनारा हा मच्छीमाराची गोल्डन बेल्ट समजला जात असून शेचड, दाढा, कोत, मुशी इ. आर्थिक उत्पन्न देणाऱ्या माशांचे प्रजनन व संवर्धन मोठ्या प्रमाणात होते. एमआयडीसीमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचा गोल्डन बेल्ट प्रदूषित होऊन मत्स्य संदपदा नष्ट होणार असून त्या विरोधात एकही सहकारी संस्था व मच्छीमार संघटना आवाज उठवीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी नवापूरमधील शेकडो तरुणांनी एकत्र येत या पाइपलाइन टाकण्यास विरोध दर्शविला व यासंदर्भात ग्रामसभा घेण्याची एकमुखी मागणी सरपंचाकडे केली. ही मच्छीमारीविरोधी पाईपलाईन कुठल्याही परिस्थितीत टाकू दिली जाणार नाही असे नवापूरच्या तरुणांनी सांगितले.तारापूरच्या औद्योगिक क्षेत्रात रासायनीक प्रक्रिया करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात असून त्या कारखान्यांमधून निर्माण झालेले सांडपाणी एकत्रीत करून प्रक्रिया केलेल व प्रक्रिया न केलेले एकत्रीत सांडपाणी नवापूर समोरील समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे समुद्र व खाड्यामधील पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन हजारो मृतावस्थेतील मासे सर्व किनारपट्टी गावांसमोर लागत असल्याचा घटना घडत होत्या. आजही उपड्या, वाड्या कालवासह अनेक माशांना रॉकेलसारखा वास येत असल्याचे मासेमारी संपुष्टात येऊन अनेक गरीब कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशावेळी एमआयडीसीने नवापूर गावामधून थेट समुद्रात ७.१० किमी अंतरावर पाइपलाइनद्वारे सांडपाणी सोडण्याची तयारी चालवली असून १ हजार मीमीचे पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. हे पाईलाईन नवापूरच्या हद्दीतून जाणार असल्याने नवापूर ग्रामपंचायतीने विकास निधीचा नावावर सुमारे ४० लाखाचा व्यवहार केला असल्याचे नवापूरच्या सरपंच अंजली बारी यांनी लोकमतला सांगितले. त्यातील सुमारे १९ लाख आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाले आहेत.
दांडी ते वडराई समुद्र प्रदूषित, मच्छी नष्ट
By admin | Published: March 22, 2015 10:35 PM