Join us  

शाळकरी मुलीवर दिंडोशीत बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 4:47 AM

नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी शाळेच्या शिपायावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी शाळेच्या शिपायावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मात्र, या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.मालाड पूर्वच्या एका शाळेत हा प्रकार घडला. दिंडोशी अप्पर गोविंदनगर परिसरात ही शाळा आहे. ही पीडित मुलगी पिंकी (नावात बदल) ही नर्सरीत शिकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विशाल सरडा (२८) हा या शाळेत शिपाई म्हणून काम करतो. १ आॅगस्ट ते ४ आॅगस्ट दरम्यान त्याने या अल्पवयीन मुलीला शाळेच्या स्वच्छतागृहात नेले. जिथे तिच्यावर लैंगिकअत्याचार केले. घाबरलेली ही मुलगी घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. जे ऐकून तिच्या आईला धक्काच बसला. तिने लगेचच दिंडोशी पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत दिंडोशी पोलिसांना सांगितले.याप्रकरणी पॉस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शाळेत जाऊन शिपायाला अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने ११ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिली.पालकांनी मागितली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी..आरोपीने असा काही प्रकार अन्य मुलींसोबत केलाय का? याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. शाळेतील हा प्रकार शाळेतील मुलांच्या पालकांना समजला. तेव्हा पालक शाळेसमोर मोठ्या संख्येने जमले. या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्या, अशी त्यांची मागणी होती. चिडलेल्या पालकांना सांभाळणे शाळा प्रशासनाच्या आवाक्याबाहेर झाले. त्यावेळी दिंडोशी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणल्याचे राठोड यांनी नमूद केले.