दक्षिण मुंबईतील मंडईत दुमजली वाहनतळ; डी. एन. रोडवरील वाहतूककोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:48 AM2019-04-18T06:48:14+5:302019-04-18T06:48:18+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रसिद्ध महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) नूतनीकरणाला वेग मिळाल्याने दक्षिण मुंबईतील पार्किंगचा प्रश्नही सुटणार आहे.

Dangajli parking in south Mumbai; D. N. Road transporters will be on the road | दक्षिण मुंबईतील मंडईत दुमजली वाहनतळ; डी. एन. रोडवरील वाहतूककोंडी सुटणार

दक्षिण मुंबईतील मंडईत दुमजली वाहनतळ; डी. एन. रोडवरील वाहतूककोंडी सुटणार

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रसिद्ध महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) नूतनीकरणाला वेग मिळाल्याने दक्षिण मुंबईतील पार्किंगचा प्रश्नही सुटणार आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये दुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ कारच नव्हे, तर दुकानांमध्ये सामान उतरविण्यासाठी येणाऱ्या मालगाड्या उभे करण्याचीही सोय असणार आहे. २०२२ पर्यंत या मंडईचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
१८६९ मध्ये बांधण्यात आलेल्या क्रॉफर्ड मार्केट या पुरातन वास्तू श्रेणी १ मधील वास्तूचे नूतनीकरण आठ वर्षांपूर्वी महापालिकेने हाती घेतले. पहिल्या टप्प्यातील नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ४९८ गाळेधारकांना त्यांच्या मूळ जागी स्थलांतरित करण्यात आले, परंतु या मंडईतील व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष सूट याचिका दाखल केल्यामुळे दुसºया
टप्प्यातील काम लांबणीवर पडले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ही याचिका फेटाळून लावल्यामुळे या मंडईच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नूतनीकरणाच्या दुसºया टप्प्यात तळघरात वाहनतळ, जुन्या इमारत पाडणे, पुरातन मंडई इमारतीची पुनर्बांधणी, फाउंटन, डोम, तीनमजली इमारत, लँडस्केपिंग, अग्निरोधक यंत्रणा आणि सौरऊर्जेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच भूमिगत दुमजली वाहनतळात १९८ वाहनं आणि २० मोठे ट्रक उभे राहू शकतील. सध्या या मंडईतील दुकानांमध्ये सामान भरणे व उतरविण्यासाठी आलेले ट्रक डी.एन.रोडवरच उभे राहत असल्याने, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. या वाहनतळामुळे ही समस्या सुटणार आहे.
२०२२ पर्यंत या मंडईचे काम पूर्ण होणे अपेक्षित
२००४ मध्ये तयार करण्यात आलेल्या धोरणानुसार, १२ मंडई असोसिएशनच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय झाला. मात्र, महात्मा फुले मंडईच्या पुनर्विकासात पालिकेचे नुकसान होत होते. त्यामुळे महापालिकेने स्वत:च मंडर्इंचा विकास करण्याचा निर्णय घेतला.
२०१८ मध्ये नूतनीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. ४९८ गाळेधारकांना त्यांच्या मूळ जागी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मंडईचे काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. काम सुरू झाल्यापासून तब्बल आठ वर्षांनी हे काम पूर्ण होणार आहे.

Web Title: Dangajli parking in south Mumbai; D. N. Road transporters will be on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.