धोका वाढतोय! धारावीत एका दिवसात कोरोनाचे १५ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:35 AM2020-04-13T02:35:46+5:302020-04-13T02:35:57+5:30

सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरू आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. दाटीवाटीने

The danger is increasing! 1 coronary artery disease in a single day | धोका वाढतोय! धारावीत एका दिवसात कोरोनाचे १५ रुग्ण

धोका वाढतोय! धारावीत एका दिवसात कोरोनाचे १५ रुग्ण

googlenewsNext

मुंबई : धारावी परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या आता ४३ वर पोहोचली आहे. राजीव गांधी क्रीडा संकुलात क्वारंटाइन करण्यात आलेल्या नऊ जणांचा यात समावेश असल्याने मोहीम योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरू आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. दाटीवाटीने वसलेल्या या लोकवस्तीत प्रभावी क्वारंटाईन शक्य नसल्याने संशयित व्यक्तींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जात आहे. यापैकी क्वारंटाईन करण्यात आलेले नऊ लोकं सोशल नगर, मदिना नगर, शास्त्री नगर आणि जनता नगरमध्ये सापडलेल्या कोरोना बाधितांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना खबरदारी म्हणून पालिकेने क्रीडा संकुलात ठेवले होते.
कोरोना बाधित नवीन रुग्णांमध्ये १३ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यापैकी ६६ आणि ५९ वर्षांच्या दोन रुग्णांना वगळता उर्वरित १३ रुग्ण तरुण आहेत. धारावीतील दहा ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली असून पालिकेचे विशेष पथक बाधित क्षेत्रांमध्ये जाऊन तेथील लोकांची तपासणी करीत आहेत. यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी साई रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने धारावीकरिता अ‍ॅक्शन प्लॅनही आखला आहे.

डॉ. बालिगा नगर पाच रुग्ण ( दोन मृत्यू)
वैभव इमारत, धारावी मुख्य रस्ता.. दोन रुग्ण
(३५ वर्षीय वैद्यकीय कर्मचारी व त्याच्या पत्नीला लागण)
मकुंद नगर झोपडपट्टी नऊ रुग्ण
मदिना नगर दोन रुग्ण (एक नवीन रुग्ण सापडला)
धनवडा चाळ एक रुग्ण (३५ वर्षीय तरुण)
मुस्लिम नगर पाच रुग्ण (तीन नवीन रुग्ण)
सोशल नगर सहा रुग्ण (एकाचा मृत्यू, त्याच्या पाच नातलगांना लागण)
जनता सोसायटी चार रुग्ण (दोन नवीन रुग्ण)
कल्याण वाडी दोन रुग्ण (एकाचा मृत्यू)
पी एम जी पी कॉलनी - एक रुग्ण मुर्गुन चाळ - एक रुग्ण
राजीव गांधी चाळ - एक रुग्ण शास्त्री नगर - चार नवीन रुग्ण

११ ते १२ एप्रिल शिबिर
खाजगी डॉक्टर 24
पालिकेचे कर्मचारी 35
पोलिस कर्मचारी 10

स्व संरक्षण किट 55
मास्क 70
हातमोजे 70
थरमोमीटर 18

एकूण नागरिकांची तपासणी 7135
चाचणीसाठी पुढे पाठवले 82
थुंकीचा नमुना घेतला 40

कुठे झाली तपासणी...
मुकुंद नगर, मुस्लिम नगर, कल्याण वाडी, सोशल नगर, मदिना नगर

Web Title: The danger is increasing! 1 coronary artery disease in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.