धोकादायक १२ मंडर्इंचा अखेर पुनर्विकास
By Admin | Published: March 28, 2015 12:36 AM2015-03-28T00:36:45+5:302015-03-28T00:36:45+5:30
मंडर्इंच्या पुनर्विकासाचे धोरण गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने अखेर धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील १२ मंडर्इंच्या विकासाला पालिकेच्या महासभेने आज हिरवा कंदील दाखविला आहे़
मुंबई : मंडर्इंच्या पुनर्विकासाचे धोरण गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने अखेर धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील १२ मंडर्इंच्या विकासाला पालिकेच्या महासभेने आज हिरवा कंदील दाखविला आहे़ मात्र
विद्यमान धोरणानुसारच हे विकासकाम होणार असल्याने यामध्ये पालिकेच्या नफ्याचा वाटा कमीच असणार आहे़
मुंबईत पालिकेच्या मालकीच्या एकूण ९२ मंडई आहेत़ यापैकी बहुतांशी मंडई मोडकळीस आल्याने त्यांची तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली़
मात्र मंडईच्या विकासाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने या मंडर्इंचा विकास रखडला़
९२ पैकी १८ मंडर्इंची खासगी ठेकेदारांमार्फत दुरुस्तीचा निर्णय यापूर्वीच झाला होता़ परंतु २५ मंडर्इंची दुरुस्ती लाल फितीत अडकली़ या दिरंगाईमुळे मोडकळीस आलेल्या मंडई धोकादायक ठरू लागल्या़ त्यामुळे अखेर पालिकेने विद्यमान धोरणानुसारच २५ मंडर्इंच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला़
मात्र विद्यमान धोरण हे विकासकांनाच फायदा मिळवून देणारे असल्याने १२ मंडर्इंच्या विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्याच दरम्यान पालिकेने सुधारित धोरण आणून त्यानुसार मंडईच्या विकासाचा हट्ट धरला़ परंतु मंडईतील गाळेधारकांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात पालिकेच्या या निर्णयाला आव्हान दिले़ न्यायालयानेही मंडर्इंची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन विद्यमान धोरणानुसार पुनर्विकासाचे आदेश दिले होते़ त्यानुसार या मंडर्इंच्या पुनर्विकासाला महासभेने आज मंजुरी दिली़ या निर्णयामुळे या मंडईमधील गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)