गवळी टोळीचा गँगस्टर मांढवेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Published: October 30, 2016 12:46 AM2016-10-30T00:46:56+5:302016-10-30T00:46:56+5:30

गँगस्टर अरुण गवळी पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच गवळी गँगचा कांजूरमार्गमधील गँगस्टर अशोक मांढवे याचा

Dangerous gang gangster nurse suspected death | गवळी टोळीचा गँगस्टर मांढवेचा संशयास्पद मृत्यू

गवळी टोळीचा गँगस्टर मांढवेचा संशयास्पद मृत्यू

Next

- मनीषा म्हात्रे, मुंबई
गँगस्टर अरुण गवळी पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच गवळी गँगचा कांजूरमार्गमधील गँगस्टर अशोक मांढवे याचा शुक्रवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करून पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
गवळी गँगचा कांजूरमार्गमधील म्होरक्या अशोक जोशी याच्या टोळीतील वाचलेला मांढवे हा शेवटचा सदस्य होता. हनुमान गल्लीतील, मुरलीधर चाळीत लहानाचा मोठा झालेला मांढवे गेल्या ५ वर्षांपासून पत्नी, दोन मुलांसोबत नेहरूनगरमध्ये राहत होता. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्याचा राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मांढवे याने घरामध्ये फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता, असा जबाब त्याच्या पत्नीने कांजूरमार्ग पोलिसांकडे नोंदविला आहे. परंतु मांढवे हा आत्महत्या करेल अशी एकही घटना घडली नव्हती. गेल्या पंधरा वर्षांत त्याच्या विरोधात एकही गुन्हा नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे डॅडी पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हालचालीची माहिती घेत पोलीस मांढरेच्या मृत्यूचा तपास करणार आहेत.
मृत्यूपूर्वी मांढरे याने कोणाला कॉल केले होते. तसेच तो गेल्या काही दिवसांत कोणा-कोणाला भेटला होता, याचीही माहिती पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
तसेच मांढवे डॅडींना भेटून आला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. मांढवे याच्या मोबाइलचा सीडीआर रिपोर्ट मागविण्यात
आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती कांजूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ निरीक्षक ए.एल. सातपुते यांनी सांगितले.
गवळी गँगच्या जोशी याच्यासह माया डोळस, पांड्या, परड्या, नाम्या, छोटा, मोठा गुरू यांचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आणि टोळीयुद्धात खात्मा झाल्यानंतर मांढवे हा एकमेव बचावला होता. त्यानंतर मांढवे हा या परिसरात केबल चालवत होता.

Web Title: Dangerous gang gangster nurse suspected death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.