Join us

धोकादायक स्कायवॉक : पालिका करणार एमएमआरडीएशी पत्रव्यवहार, स्ट्रक्चरल आॅडिटचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:03 AM

मुंबई शहरात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्कायवॉक तर बांधलेत मात्र त्याची देखभाल महापालिकेवर सोपवली आहे.

शेफाली परब-पंडित मुंबई : मुंबई शहरात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्कायवॉक तर बांधलेत मात्र त्याची देखभाल महापालिकेवर सोपवली आहे. डागडुजीअभावी यापैकी काही स्कायवॉक धोकादायक झाले आहेत. दहिसर येथील स्कायवॉकचा भाग पडल्यानंतर सर्व स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी जोर धरीत आहे. मात्र हे आॅडिट करणार कोण, असा पेच निर्माण झाला आहे. याचा मुंबईकरांना त्रास होत असल्याने एमएमआरडीएने नकार दिल्यास आॅडिट करण्याची तयारी अखेर महापालिकेने दाखवली आहे.पादचाºयांच्या सोयीसाठी मुंबईत एमएमआरडीएने २०१० ते २०१३ या कालावधीत स्कायवॉक बांधले. मात्र नागरिक आजही रस्ता ओलांडून जात असल्याने हे स्कायवॉक गर्दुल्ले व भिकाºयांचा अड्डा ठरत आहेत. तुटलेल्या पायºया, दारुड्यांचा अड्डा आणि घाणीचे साम्राज्य अशी अवस्था स्कायवॉकची झाली आहे.स्कायवॉय दुर्लक्षित राहिल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. एमएमआरडीएकडून या स्कायवॉकचे हस्तांतर झाल्यानंतर महापालिकेने त्याची देखभाल केलेली नाही, अशी तक्रार नगरसेवकांकडून होत आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०१७ मध्ये दहिसर स्थानक येथील स्कायवॉकचा भाग पडून एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मुंबईतील मोठे-लहान पादचारी पूल तसेच स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी होऊ लागली आहे.शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाकडे ही मागणी केली होती. या ठरावाच्या सूचनेला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर ही मागणी मंजूर होऊन आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. मात्र या स्कायवॉकचे हस्तांतरण २०१५ मध्ये एमएमआरडीएने केले तरी महापालिका त्याची जबाबदारी उचलण्यास फारशी उत्सुक नाही. त्यामुळे एमएमआरडीएला याबाबत विचारणा करण्यात येईल. तेथून नकार आल्यास महापालिका निविदा मागवून आॅडिटची प्रक्रिया सुरू करेल, असे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.स्कायवॉकचे आजचे वास्तवनियोजनाअभावी निर्जन झालेले स्कायवॉक व्यसनी, दारुड्यांसाठी आश्रयस्थान झाले आहे. नियमित देखभाल होत नसल्याने या स्कायवॉकच्या पायºया तुटल्या आहेत. जिथे तिथे थुंकलेले व कचरा दिसून येत आहे. काही भागांमध्ये स्कायवॉकचा वापर होत असला तरी डागडुजीअभावी हे पूल पादचाºयांसाठी धोकादायक ठरत आहेत.सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिटमहापालिकेच्या अखत्यारीतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी शहर, पूर्व व पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.महाड येथे सावित्री नदीवरील पूल पडल्यानंतर महापालिकेने मुंबईतील २७४ पुलांचे सर्वेक्षण सुरू केले. पुलांचे बांधकाम व देखभालीसाठी ब्रिज मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्यात येत आहे. मुंबईत काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने या पद्धतीने त्यांचे आयुर्मान, स्थैर्यतेचा अंदाज येणार आहे.१३७ पूल पश्चिम उपगरात, ७७ शहरात तर ६० पूर्व उपनगरात आहेत. यापैकी ११५ नाले व नद्यांवर, ४० रेल्वेवरील पूल, १२ उड्डाणपूल तर ४४ पादचारी पुलांचा समावेश आहे.१४६ वर्षांचा कर्नाक पूल, पुनर्बांधणीसाठी तोडण्यात आलेला १३५ वर्षांचा हँकॉक पूल आणि दादर येथील ९० वर्षांच्या टिळक अशा ब्रिटिशकालीन पुलांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका