रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ६ ते ९ ची वेळ धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:30+5:302021-09-18T04:06:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अपघातांचे प्रमुख कारण ...

Dangerous time for road traffic from 6 to 9 in the evening | रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ६ ते ९ ची वेळ धोक्याची

रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ६ ते ९ ची वेळ धोक्याची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. पण, आकडेवारीनुसार सर्वाधिक अपघाती मृत्यू हे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत झाले असल्याचे समोर आले आहे.

राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अपघातांचे विश्लेषण करणारा अहवाल नुकताच महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीत गेल्या वर्षी २४,९७१ अपघात झाले असून, या अपघातांत ११,५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर साधारणपणे राज्यात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतूक मंदावते. पण, याच वेळेत सर्वांत जास्त २,०४१ रस्ते अपघात घडले असून, या वेळेत सर्वाधिक २,१९० मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईचे भरधाव वेगाचे ३४९ बळी

मुंबईत गेल्या वर्षी एकूण १८१२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ६ या सहा तासांत ११३ जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये ३४९ पैकी सर्व मृत्यू हे भरधाव वेगात वाहन चालविल्याने झाले आहेत. २० अपघातांत दुचाकीस्वारांना हेल्मेट न वापरल्याने जीव गमवावा लागला.

--

वेळ - मृत्यू - गंभीर जखमी - किरकोळ जखमी

सकाळी ६ ते ९ - १३३३ - १४२४ - ६०६

सकाळी ९ ते १२ - १४५४ - २१६४ - ९११

दुपारी १२ ते ३ - १६२३ - २१०८ - ९६५

दुपारी ३ ते ६ - १८२९ - २३३८ - ११२८

संध्याकाळी ६ ते ९ - २१९० - २४४४ - १०६५

रात्री ९ ते १२ - १४५७ - १५९५ - ५७६

रात्री १२ ते ३ - ८०० - ९३९ - ३६४

रात्री ३ ते ६ - ७१८ - ८४० - २९५

अनिश्चित वेळ - १६५ - ११९ - ३३

एकूण - ११५६९ - १३९७१ - ५९४३

Web Title: Dangerous time for road traffic from 6 to 9 in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.