Join us

बिबट्यांना मिळाला प्रशस्त निवारा

By admin | Published: January 12, 2015 2:12 AM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी सात नर बिबट्यांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरकुलात स्थलांतरित करण्यात आले

जयाज्योती पेडणेकर, मुंबईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवारी सात नर बिबट्यांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. यावेळी वनमंत्री अविनाश खडगे यांच्याहस्ते बिबट्यांच्या नव्या निवाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अध्यक्ष विकास गुप्ता, साहाय्यक वनसंरक्षक संतोष सष्टे आणि वाघ व सिंह प्रकल्प अधीक्षक एस. बी. देवरे व कर्मचारी उपस्थित होते. झू अ‍ॅथॉरिटीने केलेल्या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत बिबट्यांना मोकळ््या वातावरणात मुक्तपणे व सहजपणे फिरता आले पाहिजे, या विचारातून नव्या घरकुलाची संकल्पना मांडण्यात आली. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती पूर्णत्वास आली आणि नव्या वर्षात नव्या पिंजरायुक्त घरकुलात बिबट्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे.बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २००७ मध्ये नगर जिल्ह्यातून सुटका करून आणलेले १४ बिबटे आणण्यात आले. या बिबट्यांना लायन सफारीच्या परिसरात लोखंडी दरवाजे असलेल्या सिमेंट विटांमध्ये बांधकाम केलेल्या चौरसाकृती पिंजऱ्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते. परंतु या पिंजऱ्यात बिबट्यांना मोकळे वातावरण नव्हते. बसण्यासाठी वा नैसर्गिक हालचालींसाठी जागा नव्हती. यामुळे बिबट्यांना खाणे, पिणे, झोपणे एवढाच दिनक्र म असल्याने ते कमालीचे निस्तेज झाले होते. २००८ साली केंद्रीय झू अ‍ॅथॉरिटीने राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की हे सुटका करून आणलेले बिबटे या अडचणीच्या पिंजऱ्यात योग्य नाहीत़ या बिबट्यांना मोकळ््या, स्वछ वातावरणाची गरज आहे. त्यांनी बिबट्यांना सुसज्ज असे शेल्टर बांधण्याची सूचना केली आणि निधीही उपलब्ध करून दिला. केंद्रीय प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. आता पाच वर्षांच्या कालावधीनंतर बिबट्यांसाठी सुसज्ज असे घरकूल सज्ज झाले. नखे साफ करण्याचीही जागाएक एकराच्या परिसरात आठ पिंजऱ्यांचे एक निवारा केंद्र, असे तीन निवारे उभारण्यात आले. प्रशस्त जागा, बसण्यासाठी मचाण, खेळणी, प्रत्येक पिंजऱ्याला स्वतंत्र पाण्याची जोडणी, छोटी टाकी, बाहेरील बाजूस पंख्यांची व्यवस्था, मोकळा परिसर, पिंजाऱ्यांना जोडून दोन सेफ्टी झोन, मुक्तपणे संचाराची व्यवस्था, लाकडी ओंडके, जेणेकरून सवयीप्रमाणे बिबट्यांना नखे साफ करता येतील, अशी व्यवस्था केली आहे.