ओशिवऱ्यात दरोडेखोरांना अटक
By admin | Published: April 12, 2017 02:25 AM2017-04-12T02:25:43+5:302017-04-12T02:25:43+5:30
स्वयंपाकी बनून घरफोडी करण्याचा प्रकार अंधेरीत घडला होता. या प्रकरणी दोघाना ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
मुंबई : स्वयंपाकी बनून घरफोडी करण्याचा प्रकार अंधेरीत घडला होता. या प्रकरणी दोघाना ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
अमितकुमार कामत (२३) आणि अशोक चौधरी (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अंधेरी लोखंडवाला येथील मोनिशा बंगलोमध्ये मधुकर अगरवाल (६५) हे राहातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी चौधरी आणि कामत यांना घरकामासाठी ठेवले होते.
८ एप्रिलला अगरवाल हे घरी नसताना, या दोघांनी त्यांचा नोकर टीकाबहादूर उर्फ टीकाराम याचे हातपाय बांधले. त्यानंतर, अगरवाल यांच्या घरातील पैसे आणि दागिने असा ५८ लाखांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी अगरवाल यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती कामत हा बोरीवली रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला अटक करण्यात आले. त्याच्या चौकशीतून चौधरीला वसईतून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. (प्रतिनिधी)