महामार्गावर सूचना फलकांची दुर्दशा
By Admin | Published: November 22, 2014 10:30 PM2014-11-22T22:30:11+5:302014-11-22T22:30:11+5:30
‘कारभारी दमानं, गाडी चालवू नका वेगानं..’, ‘पप्पा मी तुमची घरी वाट पाहतोय’ अशाप्रकारे भावनिक आवाहन करीत अपघातस्थळांवर वाहनांच्या वेगाला आवर घालण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले होते.
सिकंदर अनवारे - दासगाव
‘कारभारी दमानं, गाडी चालवू नका वेगानं..’, ‘पप्पा मी तुमची घरी वाट पाहतोय’ अशाप्रकारे भावनिक आवाहन करीत अपघातस्थळांवर वाहनांच्या वेगाला आवर घालण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले होते. यासाठी महामार्गावर अपघातस्थळी मोठे बॅनर लावण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून केले गेले आणि त्याचा परिणाम म्हणजे महामार्गावरील अपघातांच्या टक्केवारीत 16 टक्क्याने घटही झाली, मात्र अधिकारी बदलल्यानंतर या स्तुत्य उपक्रमाकडे पोलीस प्रशासनाने पाठ फिरवली असून जागोजागी या बॅनरची दुरवस्था झाल्याचेच दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर 2क्11-12 मध्ये लागलेले सूचना फलक चालकांच्या आणि प्रवाशांच्या मनाला चटके देणारे ठरले. या सूचना फलकांनी वाहनचालकाला त्यांच्या कुटुंबीयांची जाणीव करून दिलीच शिवाय, अपघाताची तीव्रता काय असते, त्याचे परिणाम काय होतात हे फलकावर दाखवून दिले होते. ‘पप्पा, मी तुमची घरी वाट पाहतोय’, ‘कारभारी दमानं वाहन चालवू नका वेगानं’ , ‘ वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा’ अशा अनेक सूचना वाहकांसाठी परिणामकारक ठरल्या. महामार्गावर हे बॅनर लावण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला स्थानिक व्यावसायिकांनी चांगला प्रतिसादही दिला होता. ज्यांच्या कार्यकाळात हे फलक लावले ते अधिकारी बदली होऊन इतरत्र निघून गेले, पण नवीन अधिका:यांनी हा उपक्रम पुढे न राबवता त्याकडे दुर्लक्ष केले. आज हे फलक उन्हामुळे बेरंग झाले आहेत. अनेक ठिकाणी ते कोलमडले असल्याचे चित्रही महामार्गावर दिसून येत आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार गुन्ह्यांमध्ये 55 टक्के अपघातांचे प्रमाण असते. हे बॅनर लावल्यानंतर अपघातांच्या प्रमाणात 16 टक्क्यांनी घट झाली असून हे प्रमाण 39 टक्क्यांवर आले आहे. गंभीर स्वरूपाच्या अपघातांसाठी बदनाम झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावर अशा बॅनरबाजीमुळे 16 टक्के अपघातांचा दर कमी होणो ही काही छोटी बाब नाही. पोलिसांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे हे फळ होते. यासाठी पोलीस प्रशासनाला खर्चही करावा लागला नव्हता, तर केवळ जनसंपर्क कामी आला होता. त्यामुळे अशी योजना कायम चालू राहील, अशी अपेक्षा होती. येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बदलून गेल्यानंतर आता हे बॅनर रंगहीन झाले आहेत. त्यांच्यावरील भावनिक मजकूर दिसेनासे झाले आहेत, तर अनेक ठिकाणी हे बॅनर कोलमडल्याने आता त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. आज जरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत नसली तरी हे कायम राहील, असेही नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा उपक्रम पुन्हा पुनर्जिवित करावा ही गरज निर्माण झाली आहे.
महामार्गावर अपघातांना आवर घालण्यासाठी भावनिक आवाहन करणारे सूचना फलक लावण्याची कल्पना 2क्11-12 मध्ये रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी आपल्या वरिष्ठांकडे मांडली होती. त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रत येणा:या महामार्गावर म्हणजे खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाट या सुमारे 12क् किमीच्या अंतरात राबवण्यात आली. महामार्गावर गेल्या दहा वर्षातील अपघातांची माहिती संकलित करून सुमारे 95 धोकादायक अपघातस्थळी हे सूचना फलक लावण्यासाठी निवडण्यात आले. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाणो, सार्वजनिक बांधकाम खाते, महामार्ग विभागाची मदत घेऊन त्या त्या परिसरात व्यवसाय करणा:या व्यावसायिकांच्या सौजन्याने हे फलक महामार्गावर लावण्यात आले. हे फलक लावताना अपघातग्रस्त वाहन, घरी वाट पाहत असणारे कुटुंबीय, लहान मुले अशा चित्रंचा वापर करण्यात आला होता. त्यासोबत अगदी थोडक्यात पण काळजाला हात घालणारे भावनिक आवाहनही करण्यात आले होते.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत होते. निष्पाप लोक बळी जात होते. जायबंदी होत होते. लोकांचा जनक्षोभही वाढत होता. त्यावेळी या उपक्रमाबाबत आम्ही गांभीर्याने घेतले. 1क् वर्षाची अपघातांची माहिती संकलित करून हे बॅनर लावले होते. त्याचा परिणामही लागलीच दिसून आला.
- सुहास बावचे,
उपविभागीय पोलीस अधिकारी