Join us

डेंगी-मलेरियापासून डोंबिवली सेफ !

By admin | Published: November 06, 2014 11:16 PM

डेंग्यू अथवा मलेरियाचे सर्वत्र थैमान असतांनाच डोंबिवली शहर मात्र यापासून सेफ असल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’, ‘फ’ आणि ‘ह’ प्रभाग अधिका-यांनी केला आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीडेंग्यू अथवा मलेरियाचे सर्वत्र थैमान असतांनाच डोंबिवली शहर मात्र यापासून सेफ असल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’, ‘फ’ आणि ‘ह’ प्रभाग अधिका-यांनी केला आहे. शहरातील पूर्वेसह पश्चिमेच्या ठिकाणी मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि सफाई कामगारांच्या सहाय्याने सर्वत्र देखरेख ठेवण्यात येत असून अशी कोणतीही स्थिती आढळू नये यासाठी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ही रोग राई पसरु नये यासाठी स्वच्छता, साफसफाई, नीत्यनेमाने फॉगींग(जंतु नाशक धूर फवारणी) यासह पंपाद्वारे फवारणी, पावडर टाकणे या सर्व उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. ‘ग’ प्रभागात एका मुख्य आरोग्य निरीक्षकासह ५ आरोग्य निरीक्षक, आणि २५ पेस्ट कंट्रोल करणारे कामगार, तर २१० सफाई कामगार सतर्क असल्याचे वॉर्ड अधिकारी एस.कुमावत यांनी सांगितले.