दोन लाखांची लाच घेताना वॉर्ड निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:39 AM2017-07-29T02:39:28+5:302017-07-29T02:39:31+5:30
दोन लाखांची लाच घेताना पालिकेच्या जी - दक्षिण विभागाच्या वॉर्ड निरिक्षकाला एसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. प्रविण सिंग (४५) असे अटक आरोपीचे नाव आहे.
मुंबई : दोन लाखांची लाच घेताना पालिकेच्या जी - दक्षिण विभागाच्या वॉर्ड निरिक्षकाला एसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. प्रविण सिंग (४५) असे अटक आरोपीचे नाव आहे. तक्रारदार कंपनीचे करनिर्धारणाचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी सिंगने ४ लाख रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी दोन लाख स्विकारले होते. उर्वरीत रक्कम स्विकारताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
तक्रारदार यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे जी- दक्षिण विभागात जाहिरात फलकाचे करनिर्धारणाचे काम प्रलंबित होते. ते प्रकरण मार्गी लावत त्याचे ’नो ड्यु सर्टिफिकेट’ देण्यासाठी सिंगने ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार सिंगने सुरुवातीला २ लाख रुपये दिले. मात्र उर्वरीत रक्कमेसाठी सिंगने त्यांच्यामागे तगादा लावला. अखेर वैतागून तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. त्यांच्याकडे सिंगविरुद्ध तक्रार दिली.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सिंग उर्वरीत दोन लाख रुपये घेऊन सिंगच्या कार्यलयात गेले. तेथे पैसे स्विकारताना सिंगला एसीबीने रंगेहाथ अटक केली. पालिकेच्या जी- दक्षिण विभागात कर निर्धारण व संकलन विभागात सिंग वॉर्ड निरिक्षक म्हणून काम करतो. त्याच्याकडे एसीबी अधिक तपास करत आहेत.
सरकारी वकीलही एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदार हे त्यांची घरफोडीची केस क्र. ३३२/१४ शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हरले आहेत. सदर केसची प्रमाणीत कागदपत्रे काढुन देत, वरील न्यायालयात अपील करण्यासाठी सहायक सरकारी वकील शिंदे हिने १५ हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत एसीबीकडे तक्रार येताच त्यांनी शुक्रवारी त्यांनी स्वातीला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.