महामार्गावर अंधार!
By admin | Published: July 23, 2014 12:27 AM2014-07-23T00:27:12+5:302014-07-23T00:27:12+5:30
सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी सायन - पनवेल महामार्ग आणि नवीन उड्डाणपूल गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी खुले केले आहेत.
Next
पूनम गुरव - नवी मुंबई
सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी सायन - पनवेल महामार्ग आणि नवीन उड्डाणपूल गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी खुले केले आहेत. मात्र या मार्गावरील पथदिव्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी या मार्गावरून वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या मार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि सायन पनवेल टोलवेझ प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सायन - पनवेल महामार्ग आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. नुकताच सायन- पनवेल मार्ग आणि त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे वाशी ते पनवेलर्पयत वाहतूक कोंडी शिवाय सुरक्षित आणि जलद प्रवास या मार्गावर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र अद्याप या मार्गावर स्ट्रीटलाईट बसविण्यात आले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहनांचे अपघात होतात. तसेच या मार्गावरचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यांच्या बाजूलाच रस्ता बनविण्यासाठी लागणारे साहित्य ठेवले आहे, तर काही ठिकाणी अजून ही काम सुरू आहे. यातच रात्री लाईट नसल्यामुळे वाहन चालवताना त्रस होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणो आहे.
या मार्गाचे सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही मे 2क्14 र्पयत होती. मात्र मुदत संपून जवळपास दोन महिने झाले आहेत, तरीही या महामार्गावर स्ट्रीटलाईटचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्याचप्रमाणो वाशी टोलनाक्यापुढील रस्ता, वाशी, सानपाडा, तुभ्रे, एल. पी. नेरूळ, उरण, कळंबोली उड्डाणपूल आणि जुईनगर, नेरूळ, सानपाडा, खारघर या परिसरातील महामार्गावर स्ट्रीटलाईट सुरू नाहीत. अनेक ठिकाणी फक्त स्ट्रीट लाईटचे पोल उभारण्यात आले आहेत. या मार्गावरील जुने स्ट्रीटलाईटही बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले आहेत. त्यांचा उजेडही रस्त्यावर पुरेसा पडत नाही. या कारणामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहन चालवताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाहनचालक अनेक वेळा रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास न करणोच अधिक पसंत करत आहेत.
या मार्गावरील स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरू करावेत अशी सर्व वाहनचालक आणि प्रवाशांनी मागणी केली असून यामुळे अपघात कमी होण्यासाठी मदत होणार असल्याचेही सांगितले.
सायन- पनवेल महामार्गावरील स्ट्रीटलाईटचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी स्ट्रीटलाईटचे काम पूर्ण झाले असून तपासणी सुरू आहे. तर काही ठिकाणी पोल उभारण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरचे सर्व स्ट्रीटलाईट जुलै अखेर्पयत सुरू होतील तर उड्डाणपुलावरील 15 ऑगस्टर्पयत स्ट्रीटलाईटचे काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश आगावने यांनी सांगितले.