Join us

अंधेरीतील दोन नगरसेवकांचे पद धोक्यात, जातीचे प्रमाणपत्र समितीने ठरविले अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 3:01 AM

अंधेरीतील दोन नगरसेवकांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.

मुंबई : अंधेरीतील दोन नगरसेवकांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. यावर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. अंधेरीतील भाजपा नगरसेविका सुधा सिंग तसेच चंगेझ मुल्तानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी कळवण्यात आले आहे. त्यामुळे संख्याबळात काठावर असलेल्या सेना, भाजपामध्ये पुन्हा रस्सीखेच सुरू होऊ शकते.

टॅग्स :न्यायालय