Join us

अंधेरीत टी-२० सामन्यावर सट्टा, दोन विदेशी नागरिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:40 AM

मुंबई : टी-२० सामन्यावर सट्टा लावणाऱ्या भारतीय वंशावळीच्या ब्रिटिश नागरिकासह दोघांच्या मुसक्या गुरुवारी पोलिसांनी अंधेरीच्या नामांकित हॉटेलमधून आवळल्या. गुन्हे ...

मुंबई : टी-२० सामन्यावर सट्टा लावणाऱ्या भारतीय वंशावळीच्या ब्रिटिश नागरिकासह दोघांच्या मुसक्या गुरुवारी पोलिसांनी अंधेरीच्या नामांकित हॉटेलमधून आवळल्या. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली असून आरोपींना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

ऋषी धरियाननी (४०), महेश खेमलाना (३९) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून ते हाँगकाँगचे नागरिक आहेत. धरियाननी हा भारतीय असून त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. अंधेरीच्या नामांकित हॉटेलमध्ये हा जुगार खेळला जात असल्याची माहिती कक्ष ९ चे प्रभारी महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशा कोरके यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने हॉटेलमध्ये धाड टाकली. मार्च महिन्यापासून ते वांद्रे आणि जुहू परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. जुगारासाठी पैसे घेतल्यानंतर हे दोघे ग्राहकांना मेल आयडी आणि पासवर्ड द्यायचे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल या दोन संघांत होणाºया आयपीएल सामन्यावर हे दोघे जुगार खेळायचे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

टॅग्स :पोलिसगुन्हेगारी