राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:06+5:302021-03-27T04:07:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याचे ...

The darker the corona crisis in the state | राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद

राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी राज्यात ३६ हजार ९०२ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात १७ हजार १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत २३ हजार ५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

एकट्या मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५ हजार ५१५ रुग्ण सापडल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसोबतच पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नाशिक ग्रामीण, पुणे ग्रामीण, ठाणे व जळगाव येथील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आता राज्यात १४,२९,९९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, १४,५७८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शुक्रवारी राज्यात एकूण २,८२,४५१ सक्रिय रुग्ण होते.

मुंबई ५५१५, पुणे ३६७९, नागपूर ३०५५, नाशिक २०८०, पिंपरी-चिंचवड १६८२, पुणे ग्रामीण १६८६, औरंगाबाद १५६३, नाशिक ग्रामीण १२८१, ठाणे १०२०, जळगाव ९६७.

Web Title: The darker the corona crisis in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.