गणेशोत्सवात मुंबईत दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:34 AM2018-09-08T03:34:31+5:302018-09-08T03:34:43+5:30

मुंबईतील गणेशोत्सवात यंदा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दिसणार आहे. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाचवेळी आल्याने गणेश मंडळांत काम करणारे हिंदू व मुस्लीम बांधव दोन्ही सणांच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत.

 Darshan of Hindu-Muslim unity will be seen in Mumbai at Ganesh Festival | गणेशोत्सवात मुंबईत दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

गणेशोत्सवात मुंबईत दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

Next

- चेतन ननावरे

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवात यंदा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दिसणार आहे. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाचवेळी आल्याने गणेश मंडळांत काम करणारे हिंदू व मुस्लीम बांधव दोन्ही सणांच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना हे ऐक्य म्हणजे चपराक असल्याची भावनाही या मंडळांतील पदाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
मुंबईतील लाल बत्ती म्हणून परिचित असलेल्या कामाठीपुरा परिसरात सध्या मोहरमसह गणेशोत्सवाची धूम आहे. येथील अकराव्या गल्लीत बसणाºया सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळाच्या ‘कामाठीपुराचा गणाधीश’साठी हिंदू, मुस्लीमच नव्हे, तर तिबेटीयन आणि नेपाळमधील कार्यकर्तेही काम करताना दिसतात. मंडळाचे समन्वयक गणेश महाराज यांनी सांगितले की, सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचे काम मंडळ गेल्या ६९ वर्षांपासून करीत आहे. मंडळाकडून परिसरातील वेश्याव्यवसाय करणाºया महिलांसह त्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मंडळात विविध जाती आणि धर्माचे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर स्वत: सलीम शहा कार्यरत असून अब्दुल हमीद कलिंगल यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन उत्सवात सामील होणारे हिंदू बांधव यंदाच्या मोहरममध्ये बीबी फातिमाची सेवा करताना, तर मुस्लीम बांधव गणेशोत्सवात मनोभावे ‘गणाधीशा’ची पूजा करताना दिसतील. दक्षिण मुंबईतील महात्मा जोतिबा फुले मंडई मजदूर संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

लहानपणापासून मंडळात काम करताना येथील सर्वधर्मीय एका कुटुंबीयांप्रमाणे उत्सव साजरा करत आहोत. म्हणूनच मुंबईत दंगल झाली, तरी येथील वातावरण कधी दूषित झाले नाही. यंदा तर मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रितपणे साजरा करताना आनंद द्विगुणित झाला आहे.
- सलीम शहा, उपाध्यक्ष, कामाठीपुराचा गणाधीश

माझ्या मते सर्व देव एकच आहेत. त्यामुळे देवांना धर्मात वाटणे अयोग्य आहे. लोक काहीही बोलतात. मात्र, त्यांच्याकडे लक्ष देण्यास कधीच वेळ मिळाला नाही. हमाल वर्गाने बसविलेल्या या गणपतीसाठी व्यापारी, टेम्पो चालक, मालकही एकत्र येतात. हेच खरे साध्य आहे.
- बशीर शेख, उपाध्यक्ष, महात्मा जोतिबा फुले मंडई,
मजदूर संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Web Title:  Darshan of Hindu-Muslim unity will be seen in Mumbai at Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.