'भवताल'मध्ये घडणार सभोवतालच्या वातावरणाचे दर्शन

By संजय घावरे | Published: January 3, 2024 03:38 PM2024-01-03T15:38:22+5:302024-01-03T15:38:30+5:30

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम 

Darshan of the surrounding environment will take place in 'Bhavtal' | 'भवताल'मध्ये घडणार सभोवतालच्या वातावरणाचे दर्शन

'भवताल'मध्ये घडणार सभोवतालच्या वातावरणाचे दर्शन

मुंबई - विद्यादान सहायक मंडळाच्या दृष्यकला विभागामार्फत 'भवताल' प्रकल्पात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबईत ५ जानेवारी ते ७ जानेवारी या काळात कलाप्रेमींसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. 

ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पद्यश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्याजवळच्या मणी भवन मागील गांधी फिल्म फाऊंडेशनमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तीन दिवस प्रदर्शन भरविण्यात येणा आहे. विद्यादान सहायक मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साह्य केले जाते. मंडळाच्या दृश्यकला विभागात राज्यातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधून संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारा भविष्यातील नागरिक घडविण्याचा मंडळाकडून प्रयत्न केला जात आहे.

यंदाचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या कलाकृतींचे आहे . गांधी फिल्म फाऊंडेशनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात अनेक आकर्षक कलाकृती मांडण्यात येणार आहेत. प्रत्येकाची जडणघडण आपल्या सभोवतालच्या वातावरणातून होते. माणूस म्हणून घडत जाणे, या सभोवतालाशी संबंधित असते. कलाकारांचाही त्याला अपवाद नसून, सभोवतालच्या खूणा त्यांच्याकडून संवेदनशीलतेने मांडल्या जातात. ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी कलाकृती तयार केल्या आहेत.

Web Title: Darshan of the surrounding environment will take place in 'Bhavtal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.