ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:21 PM2022-09-19T21:21:49+5:302022-09-19T21:27:33+5:30

उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान शोधावे लागणार आहे. आणखी कोणती मैदाने मिळू शकतात, या शोधात आता शिवसेना नेते आहेत. 

Dasara Maelava: Uddhav Thackeray Shivsena Group lost second ground of bkc fro Dussehra gathering to Event Company | ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले

ठाकरे गट पुन्हा एकदा गाफिल राहिला; दसरा मेळाव्याचे दुसरेही ग्राऊंड गेले

googlenewsNext

दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी माहिती हाती येत आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हातून बीकेसीतील आणखी एक मैदान गेले आहे. ठाकरे गटाने अर्ज केलेले दुसरे मैदान कॉलिन्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड या इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी मैदान हवे म्हणून अर्ज करण्याच्या एक महिना आधीच या कंपनीने अर्ज केला होता. यामुळे या कंपनीला हे मैदान देण्यात आले आहे. 

या मैदानावर ही कंपनी मोठे प्रदर्शन भरविणार आहे. यामुळे आता ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान शोधावे लागणार आहे. आणखी कोणती मैदाने मिळू शकतात, या शोधात आता शिवसेना नेते आहेत. 
शिवसेनेच्या कामगार सेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण एका कंपनीकडून याआधीच कार्यक्रमासाठी ग्राऊंड आरक्षित केलेलं असल्यानं ठाकरेंना परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसीमध्ये दोन मैदानं आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

...तर मग शीवतीर्थवर आम्हालाच परवानगी 
बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शीवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यसाठी आम्हालाच परवानगी मिळायला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. "आमचा गट वगैरे काही नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि एमएमआरडीएवर शिंदे गटाला परवानगी देण्यात आल्याचं मला कळालं. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषाअंतर्गत त्यांना परवानगी देण्यात आली असेल तर शीवतीर्थवर शिवसेनेलाच परवानगी मिळायला हवी. कारण आम्ही आधी अर्ज दाखल केला आहे. दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीवगैरे करण्याची आम्हाला गरज नाही. परंपरेनुसार शीवतीर्थवरच शिवसेनेचा मेळावा होईल", असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Dasara Maelava: Uddhav Thackeray Shivsena Group lost second ground of bkc fro Dussehra gathering to Event Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.