Join us

Dasara Melava: दसरा मेळाव्यावरून वाद; ठाकरे - शिंदे आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 8:30 AM

Dasara Melava: शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्याची भूमिका घेत शिंदे गटाने तसा अर्ज महापालिकेकडे केल्याने शिंदेविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे चित्र आहे.

मुंबई : शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्याची भूमिका घेत शिंदे गटाने तसा अर्ज महापालिकेकडे केल्याने शिंदेविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे चित्र आहे. शिंदे-ठाकरे हे या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने आता हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आम्ही आमदार पुढे नेत आहोत. इतरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मांडीवर बसवून हिंदुत्वाचा चोळामोळा आहे. गेली १५ वर्षे मी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करत असतो. यावर्षीही आमचीच शिवसेना खरी असल्याने दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी, असा अर्ज केल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली, तर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्हीच आधी अर्ज सादर केला. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्याला कृपया छेद देऊ नका. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असे ठणकावले आहे.

मनसेची मदत घेणार मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा आपण दावा करतो तर मग दसरा मेळावा आणि तोदेखील शिवाजी पार्कवरच आपण घेतला पाहिजे, असा आग्रह समर्थक आमदारांनी शिंदे यांच्याकडे धरला. त्यातच भाजपकडून या मेळाव्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा शब्द दिला गेला, अशी माहिती आहे.  शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुरुवारी अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी शिवाजी पार्कवर शिंदे यांनी मेळावा घ्यावा आणि राज ठाकरे यांनी त्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करावे या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते. शिंदे-राज असा एकत्रित मेळावा घेतला तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असे गणित मांडले जात आहे. 

आधीच्या अर्जावर निर्णय नाहीठाकरे गटाने  या मेळाव्यासाठी केलेल्या अर्जावर महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नसताना शिंदे गटाचे दादर-माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या नेतृत्वातील मेळाव्यासाठी अर्ज केला. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे. 

...तर नेस्को, बीकेसीचा पर्यायमहापालिकेने ठाकरे यांना परवानगी दिली वा प्रकरण कोर्टात जाऊन कोर्टाने ठाकरेंना परवानगी दिली तर पर्यायी जागा म्हणून शिंदे गटाने शिवाजी पार्कसोबतच मुंबईतील नेस्को, बीकेसी, सोमय्या आदी मैदानेदेखील या दिवशी बुक करता येतील का याची चाचपणी सुरू केल्याचे समजते.साखर कारखान्यांचे बाॅयलर पेटणारमराठवाड्यातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश देऊनही अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने यंदा १ ऑक्टोबरपासूनच सर्व कारखान्यांचे गाळप सुरू करण्याचे आदेश दिल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना