Join us

दासगुप्ता याची रवानगी थेट कारागृहात, कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास काेर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 5:58 AM

न्या. पी.डी. नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी दासगुप्ता याच्या अर्जावर सुनावणी घेतली. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज नोटनुसार तळोजा कारागृहातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील.

मुंबई : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता याला जे.जे. रुग्णालयातून तळोजा कारागृहात हलविण्याच्या कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.न्या. पी.डी. नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी दासगुप्ता याच्या अर्जावर सुनावणी घेतली. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज नोटनुसार तळोजा कारागृहातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. दोनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दासगुप्ता याचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अंतरिम जामीन सुनावणी करण्याची विनंती न्यायालयाला केली. अन्यथा हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी पाठवा, अशी विनंती केली आहे.दासगुप्ताची तब्येत ठीक नसताना त्याला तळोजा कारागृहात हलविण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने अर्ज केल्याचे दासगुप्ता याचे वकील अर्जुन सिंह ठाकूर यांनी सांगितले. त्यावर ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले, दासगुप्ताची तब्येत ठीक असल्याने त्याला जे.जे.तून तळोजात नेण्यात येत आहे. न्यायालयाने डॉक्टरांचे सर्व कागदपत्रे सोमवारी सादर करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले. 

टॅग्स :न्यायालयपोलिसजे. जे. रुग्णालयतुरुंग