इंजिनीअरिंगचे वर्ग आता १ डिसेंबरपासून; तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 09:22 AM2020-10-20T09:22:06+5:302020-10-20T09:22:14+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि निकाल लांबले. त्यामुळे आता कुठे राज्यांच्या शैक्षणिक संस्थांतील प्रवेशांना सुरुवात होणार आहे. या कारणास्तव राज्यांतील आयआयटी, एनआयआयटीमधील प्रवेशांची मुदत वाढवून ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) इंजिनीअरिंगच्या नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली. याआधीच्या वेळापत्रकाप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश एआयसीटीईने दिले होते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि निकाल लांबले. त्यामुळे आता कुठे राज्यांच्या शैक्षणिक संस्थांतील प्रवेशांना सुरुवात होणार आहे. या कारणास्तव राज्यांतील आयआयटी, एनआयआयटीमधील प्रवेशांची मुदत वाढवून ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
राज्यातील वर्गही सीईटी निकालानंतरच -
देशपातळीवरील इंजिनीअरिंग परीक्षांप्रमाणेच राज्यातील सीईटी परीक्षांनाही यंदा लेटमार्क लागला. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांना परीक्षेची आणखी एक संधी मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी टिष्ट्वटद्वारे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील सीईटी निकालानंतर नोव्हेंबरअखेरपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून इंजिनीअरिंगच्या वर्गांचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्यातील तंत्र शिक्षण संस्थांवर असेल.