Join us

सूर्या नदीवर अद्ययावत पूल उभारणीचे काम युद्धपातळीवर

By admin | Published: March 16, 2015 11:07 PM

अनेक बळी यानंतर लोकमतने नवीन पूल बांधणीकरीत बातम्यांच्या माध्यमातून अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन पूल बांधणीचे काम मार्गी लागले आहे.

पंकज राऊत ल्ल बोईसरतारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) व महाराष्ट्रातील अग्रगण्य तारापुर एमआयडीसी या तिन्ही अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पांना जोडणारा व प्रतिदिन सुमारे तीन हजार अवजड वाहनांसह एकूण सुमारे बारा हजार लहान मोठ्या वाहनांची अहोरात्र वाहतूक होणाऱ्या बोईसर-मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून व १८ कोटी ४० लाख रू. खर्चून पूल उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून खिळखिळा झालेला जुना पूल व त्याचा कठडा त्यामुळे झालेले भीषण अपघात व गेलेले अनेक बळी यानंतर लोकमतने नवीन पूल बांधणीकरीत बातम्यांच्या माध्यमातून अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन पूल बांधणीचे काम मार्गी लागले आहे.सध्या वापरात असलेला जुना पूल हा १९७२ मध्ये बांधून त्या पूलाला आता त्रेचाळीस वर्षे झाली आहेत. त्या जुन्या पूलाचा स्लॅब सोडून इतर स्ट्रक्चर हे संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे तर पूलाचे प्रत्येकी १८-२ मीटर लांबीचे एकुण आठ गाळे आहेत. २०१२ मध्ये आठ दिवस होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीचे सर्वेक्षण केले असता लाईट, मिडीयम व हेवी गटातील सुमारे ११३८४ वाहने सरासरी या पुलावरून ये-जा करीत असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता.जुन्या पूलाला ४३ वर्षाचा कालावधी झाल्याने तसेच दिवसेंदिवस पूल व पूलाचा क ठडा खिळखिळा होत असल्याने थोडाशा धक्क्याने कठडा तुटून वाहने खोल नदीत कोसळून अनेक अपघातात असंख्य बळी गेले आहेत. ही बाब लोकमतमधून अनेकदा एमआयडीसी प्रशासनासमोर मांडली होती.याची दखल घेऊन २०११ मध्ये एमआयडीसीने मुंबई येथील आय.आय.टी च्या तज्ज्ञांना सूर्या नदीवरील पूलाची पाहणी करण्यास पाचारण केले. सध्या अस्तित्वात असलेल्या पूलाचे आयुष्य हे जास्त काळ शक्य नसल्याने दुसरा पूल बांधण्याची शिफारस केली. त्यानंतर नवी मुंबई येथील धूप कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या सल्लागार संस्थेकडून नवीन पुलाकरीता सर्वेक्षण, फॉईल इन्व्हेस्टीगेशन डिझाईन तयार करून घेण्यात आले. तद्नंतर नवीन पूलाचे डिझाईन व ड्रॉर्इंग व्हीजेटीआय या नामांकित इंजिनिअरींग कॉलेज कडून तपासण्यात येऊन मंजूर झाले. तद्नंतर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता हे सोपस्कार झाले.४प्रतिदिन बारा हजार वाहनांची वाहतूक ४तारापूर अणुऊर्जा, बी.ए.आर.सी. व एम.आय.डी.सीला जोडणारा महत्वाचा पूल४१८ कोटी ४० लाखाचा निधी लागणार उभारणीला४पुलाची लांबी १५० मी., उंची १५ मी. तर रूंदी २१ मीटर