शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:29+5:302021-07-30T04:06:29+5:30

१० ऑक्टोबरला होणार परीक्षा, राज्य परीक्षा परिषदेची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १० ...

The date of Teacher Eligibility Test was fixed | शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ठरली

शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख ठरली

Next

१० ऑक्टोबरला होणार परीक्षा, राज्य परीक्षा परिषदेची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी ७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख उमेदवार यावेळी परीक्षेला बसतील आणि परीक्षार्थींची संख्या यंदा वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

परीक्षेचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी - ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)

प्रवेशपत्राचे ऑनलाईन प्रिंट घेणे - २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

Web Title: The date of Teacher Eligibility Test was fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.