दत्ता इस्वलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:04+5:302021-04-09T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माेठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वरळी येथील स्मशानभूमीत यानंतर त्यांचे पार्थिव नेण्यात आले. यावेळी अनेक गिरणी कामगार उपस्थित होते. साडेअकरा वाजण्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्ता इस्वलकर यांचे यांचे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता जे. जे. रुग्णालय येथे निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे होते. गेले तीन ते चार वर्षे ते आजारी होते. बुधवारी सकाळी मेंदूतील रक्तास्राव गोठल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरीराने त्यांना साथ न दिल्याने सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. २ ऑक्टाेबर १९८९ साली गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. दत्ता सामंत यांच्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला.