मुंबई : पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर ३७ वर्षे पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावून गुरुवारी सेवानिवृत्त होत असलेतरी त्यानिमित्य होणारे ‘फेअरवेल’चा कार्यक्रम नाकारला आहे. इतकेच नव्हे तर पोलीस मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने निरोप देण्याचा कार्यक्रम करण्याबाबत असर्मथता दर्शविली आहे.दरम्यान, त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जायस्वाल दावेदार आहेत. मात्र त्यांना आयुक्तपदावर केवळ सहाच महिने झाल्याने आणि त्यांचा वारसदार अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे पोलीस महासंचालक पद रिक्त ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्याचा अतिरिक्त कार्यभार अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांच्याकडे सोपविण्याची शक्यता असे गृह विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आले. वास्तविक मुंबईच्या आयुक्तपदासाठी सिंह यांचे नाव एसीबीचे प्रमुख संजय बर्वे यांच्याबरोबर चर्चेत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अद्याप त्याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम ठेला आहे.महाराष्ट्रातील अखिल भारतीय पोलीस अधिकारी असोशिएशनच्यावतीने रिटायर होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सन्मानपुर्वक निरोप (फेअरवेल) दिला जातो. त्यानिमित्य वरळी येथील पोलीस कॅटीनमध्ये स्रेहभोजन आयोजिण्यात येत असते.मात्र पडसलगीकर यांनी हा कार्यक्रम घेण्यास नकार दिला आहे. असे करणारे संजीव दयाल यांच्यानंतरचे गेल्या पाच वर्षातील पहिलेच पोलीस महासंचालक ठरणार आहेत. दोन टप्यात सहा महिन्याची मुदतवाढ मिळाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांची दोन वर्षाची मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला आहे. यावरुन अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्याबाबत उलटसुलट मते व्यक्त होत असल्याने त्यांनी निरोप समारंभाला उपस्थित न राहण्याचे ठरविले असल्याचे समजते.दीड वर्षात चौघांनी नाकारला फेअरवेलराज्य सरकारकडून विविध कारणामुळे दुखाविल्या गेलेल्या चार महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांनी गेल्या दीड वर्षात ‘फेअरवेल’च्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. त्यामध्ये राकेश मारिया, प्रभात रंजन, व्ही डी. मिश्रा व एस.पी.यादव यांचा समावेश आहे. सेवा जेष्ठ असूनही ‘ साईड पोस्टीग’वर निवृत्त केल्याने त्यांनी निरोप समारंभावर बहिष्कार खालून निषेध व्यक्त केला आहे.उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांचा बदल्यागृह विभागाकडून बुधवारी काही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यांची नावे अशी : (कंसात कोठून- कोठे)उपायुक्त/ अधीक्षक सर्वश्री मौक्षदा पाटील (वासीम- औरंगाबाद ग्रामीण), आरती सिंघ (औरंगाबाद ग्रामीण-नाशिक ग्रामीण),अप्पर अधीक्षक विवेक पानसरे ( धुळे- ठाणे शहर),वसंत परदेशी (पीसीआर औरंगाबाद- अधीक्षक, औरंगाबाद), संभाजी कदम (नागपूर शहर- पुणे शहर)रफिक युसुफ शेख (अंमळनेर, जळगाव - नवी मुंबई), संजीव कांबळे (नागपूर शहर -रस्ता सुरक्षा विषयक परिवहन संस्था, मुंबई)
पडसलगीकरांनीही नाकारला ‘फेअरवेल’चा कार्यक्रम; मुंबईच्या नव्या शिलेदाराचा सस्पेन्स कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 10:24 PM