...म्हणून त्यानं सोशल मीडियावर टाकली दाऊदच्या वाढदिवसाची पोस्ट; कारण वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:06 AM2019-12-29T03:06:19+5:302019-12-29T06:36:19+5:30
बर्थडे सेलिब्रेशनची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले
मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या बर्थडे सेलिब्रेशनची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. २६ डिसेंबरला ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान फेसबुकवरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची माहिती टोळीतील एकाने दिली.
व्हॉट्सअॅप ग्रूप आणि ‘फेसबुक’वर दाऊदचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो पोस्ट करण्यात आले. ‘हॅप्पी बर्थ डे बॉस’, असा उल्लेख केकवर करत शेरा चिकना नामक इसमाने हे फोटो फेसबुकवर पोस्ट केले. हे सेलिब्रेशन चिकनाच्या डोंगरी येथील घरी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोस्ट टाकणाºया चिकना व त्याच्या टोळीला मुंबई पोलिसांनी डोंगरीतून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. २६ डिसेंबरला दाऊदचा वाढदिवस असतो. तो आता ६४ वर्षांचा झाला आहे. चिकना याने आणखी तिघांना वाढदिवस साजरा करतानाची ही पोस्ट टॅग केली. त्यानंतर ती व्हायरल झाली होती. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवरही ती पाठवली होती. हे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाई केली.
Mumbai Police Crime Branch: A man detained from Dongri, for celebrating underworld don Dawood Ibrahim's birthday. On interrogation the man revealed that he did this to increase followers on Facebook&that he was celebrating his acquaintance Dawood's birthday¬ Dawood Ibrahim's.
— ANI (@ANI) December 28, 2019
ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू असून त्यांचा दाऊदशी काही संबंध आहे का, याचा तपासही केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या एका वकिलानेदेखील गँगस्टरचा अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याला आक्षेप घेतला असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.