दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:37+5:302021-04-03T04:05:37+5:30
एनसीबीची राजस्थानमध्ये कारवाई, डोंगरीत संभाळत होता ड्रग्जची फॅक्टरी दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला अटक एनसीबीची राजस्थानमध्ये कारवाई; डोंगरीत संभाळत होता ...
एनसीबीची राजस्थानमध्ये कारवाई, डोंगरीत संभाळत होता ड्रग्जची फॅक्टरी
दाऊदचा हस्तक दानिश चिकनाला अटक
एनसीबीची राजस्थानमध्ये कारवाई; डोंगरीत संभाळत होता ड्रग्जची फॅक्टरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला एनसीबीने राजस्थानमधून अटक केली. दानिश हा मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. त्याच्याकडून काही प्रमाणात ड्रग्जही सापडले असून एनसीबी अधिक तपास करत आहे.
गेल्या आठवड्यात एनसीबीने डोंगरी भागातील दानिशच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला होता. मात्र त्यापूर्वीच तो पसार झाला होता. त्यानंतर एनसीबी पथक त्याच्या मागावर होते. तो राजस्थानमध्ये असल्याचे समजताच पथक राजस्थानला रवाना झाले. तेथून चिकनाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ड्रग्जही सापडले असून एनसीबी अधिक तपास करत आहे. त्याला मुंबईत आणण्यात येत आहे.
अभिलेखावरील गुन्हेगार असलेल्या दानिशविरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यातही खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारच्या ६ गुन्ह्यांची नाेंद आहे. तर एनसीबीच्या दोन गुन्ह्यांत तो फरार होता.
* तीन महिन्यांत ७ परदेशी ड्रग्ज तस्कर जाळ्यात
एनसीबीची धडक कारवाई सुरू असून गुरुवारी नवी मुंबई आणि मुंबईत केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. यात नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून नायजेरियन नागरिकाला २६० ग्रॅम एमडी आणि २२ ग्रॅम कोकेनसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू आहे. तर दुसऱ्या कारवाईत बुधवारी जोगेश्वरीतून नासीर समीरुद्दीन या तरुणाला ५५ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडेही अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, एनसीबीने वर्षाच्या सुरुवातीपासून ड्रग्ज तस्करावरील धडक कारवाईचा वेग कायम ठेवला आहे. यात आतापर्यंत ७ परदेशी ड्रग्ज तस्करांकडून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.
.................................