Join us

'दाऊदच्या मृत्यूच्या वावड्या कोरोनाच्या अपयशामुळेच'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:10 AM

यासंदर्भात सावंत म्हणाले की, कराचीतील पाकिस्तानी रूग्णालयात दाऊदचा मृत्यू झाल्याच्या बातम्या झळकत आहेत. याचा खुलासा केंद्र सरकारने करायला हवा.

मुंबई : कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकारला मोठे अपयश आले आहे. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्नही सोडवता आला नाही. हे अपयश लपविण्यासाठीच दाऊदच्या मृत्यूच्या वावड्या उठविल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवावे आणि तसे देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, कराचीतील पाकिस्तानी रूग्णालयात दाऊदचा मृत्यू झाल्याच्या बातम्या झळकत आहेत. याचा खुलासा केंद्र सरकारने करायला हवा. २०१४ पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग घडत आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यास फोन केला, अशा बातम्याही आल्या. जेव्हा मोदी सरकार विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते हा योगायोग दिसून आला आहे.

टॅग्स :दाऊद इब्राहिमकाँग्रेस