Join us

२६ डिसेंबरला दाऊदचा वारसदार जाहीर होणार ?

By admin | Published: December 24, 2015 1:53 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वाढते वय आणि प्रकृतीमधील चढ-उतारांमुळे गुन्हेगारीमधून निवृत्ती घेण्याच्या विचारामध्ये आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - डोंगरीतल्या छोटयाशा गल्लीतून गुन्ह्यांची सुरुवात करुन गुन्हेगारीचे साम्राज्य उभा करणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वाढते वय आणि प्रकृतीमधील चढ-उतारांमुळे गुन्हेगारीमधून निवृत्ती घेण्याच्या विचारामध्ये आहे. 

येत्या शनिवारी दाऊद ६० व्या वर्षात पदार्पण करत असून या निमित्ताने पाकिस्तानात जंगी पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या बर्थडे पार्टीमध्ये दाऊद त्याचा वारसदार जाहीर करेल अशी गुन्हेगारी वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. दाऊदचे वारसदार म्हणून त्याचा भाऊ अनीस अहमद, हुमायू मुस्तकीम तसेच त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील यांची नावे चर्चेत आहेत. दाऊदची पत्नी मेहजबीन, मुलगी महारुख आणि मुलगा मोईन यांची नावेही चर्चेत आहेत. 
दरम्यान दाऊदचा भाऊ नूराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा दुसरा भाऊ इक्बाल कासकर भारतात परतला. आता त्याचे तीन भाऊ अनीस, हुमायू आणि मुस्तकीम त्याच्यासोबत रहातात. हुमायू आणि मुस्तकीम गॅगमध्ये तितके सक्रीय नाहीत. आजारपणामुळे मुस्तकीम घरीच असतो. त्यामुळे भाऊ म्हणून अनीसकडे दाऊदचा वारसा येण्याची शक्यता जास्त आहे. दाऊदची पत्नी, मुले त्याच्यासोबत असली तरी, त्यांचा गुन्हेगारी जगताशी तितका संबंध नाही. 
वारसदार कोणी बनला तरी, दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकीलचे गॅंगमधील तेच स्थान कायम राहू शकते असे सूत्रांनी सांगितले. १९९४ साली छोटा राजनने दाऊदची साथ सोडल्यानंतर छोटा शकीलने भारतातील कारवायांची गॅंगची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. ड्रग, हवाला, तस्करी, रिअल इस्टेटमध्ये मिळून दाऊदचे साम्राज्य १० अब्ज डॉलरचे आहे. 
ज्यांना दाऊदच्या बर्थ डे पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे त्यांनाही पार्टीची जागा अजून सांगण्यात आलेली नाही. पार्टीच्या काही मिनिट आधी त्यांना हॉटेलमधून थेट पार्टीच्या ठिकाणी नेण्यात येईल