Join us

व्यापाऱ्यांना धमकावण्यासाठी दाऊदच्या पुतण्याचा वापर; तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:16 AM

वधारिया (२४) यानेच व्यापाऱ्यांना धमकाविण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान कासकरचा वापर केल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर येत आहे.

मुंबई : खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या अहमदरझा वधारिया (२४) यानेच व्यापाऱ्यांना धमकाविण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान कासकरचा वापर केल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर येत आहे. या प्रकरणात अहमदरझाने आणखी कोणाची मदत घेतली आहे का, याचा तपास, तसेच त्याच्या अन्य साथीदारांचा शोध खंडणी विरोधी पथक करत आहे.मूळचा सूरतचा रहिवासी असलेला अहमदरझा हा दुबईत राहतो. मुंबई, गुजरातमधील हवाला व्यापाºयांची फसवणूक करायची. यात, फसलेल्या व्यापाºयांनी पैशांची मागणी करताच, तो त्यांना धमकावायचा. त्याने यापूर्वी व्यापाºयांद्वारे मोठी रक्कम दुबईसह परदेशात पाठविली आहे. त्याची दलालीसह रक्कमही त्याला मिळाली होती.मात्र, त्याला रक्कम मिळूनही ती रक्कम भारतातल्या व्यापाºयांना न मिळाल्याने त्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. तेव्हा त्याने व्यापाºयांना पैसे द्यायला लागू नयेत यासाठी त्यांना धमकावण्याचे ठरवले व त्यासाठी रिझवानची मदत घेतली.रिझवानने त्याची छोटा शकील आणि फहीम मचमचशी ओळख करून दिली. यात रिझवानच्या ओळखीने दाऊदच्या हस्तकांद्वारे मुंबईसह गुजरातमधील व्यापाºयांना त्यांनी पैशांसाठी तगादा लावू नये यासाठी धमकावण्यात आल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे. त्यानुसार, खंडणी विरोधी पथक अधिक चौकशी करत आहे. तपासाअंती या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.