ईदच्याच दिवशी मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या, बहिणीवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:08 AM2017-09-04T03:08:56+5:302017-09-04T03:09:06+5:30
ईदच्याच दिवशी मालमत्तेच्या वादातून दोन भावांनी मोठा भाऊ आणि बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला तर बहिणीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Next
मुंबई : ईदच्याच दिवशी मालमत्तेच्या वादातून दोन भावांनी मोठा भाऊ आणि बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला तर बहिणीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे.जे मार्ग पोलिसांनी दोन भावांना अटक केली.
नझिरुद्दीन मेहबुद काझी (४८) हे बहिण रुखैया काझी (५५) सोबत राहतात. शनिवारी दुपारी ईदच्या निमित्ताने अमिरुद्दीन मेहबुद काझी (४५) अलाहुद्दीन मेहबुद काझी (४७) ही चारही भावंडे एकत्र आले होते. याच दरम्यान घराच्या मालकी हक्कावरुन वाद झाल्याने दोघांनी नझिरुद्दिनवर व रुखैयावर चाकूने वार केले.