मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही संजय राठोड प्रकरणावरून राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाही, पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यापासून ते १५ दिवस गायब झाले होते, त्यानंतर अचानक त्यांनी पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून त्यांची बाजू मांडली. त्यानंतर, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत संजय राठोडप्रकरणी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. तसेच, पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याचे म्हटले. आज पुन्हा एकदा संजय राठोड प्रकरणात वाघ यांनी काही महत्त्वाची माहिती पोलिसांना सांगितली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. राठोड यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. याचवेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर जबरी टाकी केलीय ''ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील'' अशा तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास असल्याचंही मत मांडलय.
सॅमसंग गॅलक्झी एस10 लाईट ग्रे कलरचा फोन आहे, या फोनच्या डिस्प्लेवर 45 कॉल हे संजय राठोडचे दिसत आहेत. ज्या दिवशी पूजा चव्हाणची आत्महत्या झाली, त्याचदिवशी हे 45 मिस कॉल्स आले होते, याचं स्पष्टीकरण पोलीस देणार आहेत का, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना विचारला. मग, हा संजय राठोड कोण आहे, हेही पोलिसांनी सांगाव. पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस महासंचालकांनी हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन, एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही चित्राव वाघ यांनी केलीय. मंत्रिमंडळातील सगळे मंत्री एकच आहेत, पण केवळ मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. कारण, हा केवळ एका पूजा चव्हाण आणि संजय राठोडचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील सगळ्या मुली अन् महिलांचा आहे, असेही वाघ यांनी म्हटलंय.
प्रकरण रफादफा करण्यासाठीच पोलीस बसवलेत
12 ऑडिओ क्लिप्स बघून आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले आहे. अरुण राठोडच्या फोनवर आलेले हे सगळे फोन होते. परंतू, त्याच्या फोनमधला डेटा रिकव्हर का नाही? पुणे पोलिसांनी काही चेक केले का? कसं लपवून, झाकून ठेवायचं हे पुणे पोलिसांनी सिद्ध केले आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या भाषेत बोलले आहेत त्यावरून ते पूजा प्रकरण रफादफा करायला बसवले आहे असे वाटते. 17 दिवस उलटून देखील एफआयआर का नाही? या सध्या प्रश्नावर ते म्हणाले ,'लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. यावेळी पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला?
वार नसतानाही डॉक्टर का आला
राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. संजय राठोडची चौकशीच नाही, तोवर अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. मध्यरात्री 100 नंबरला कॉल गेला, मुलगी बिल्डिंगवरून खाली पडली. त्यानंतर सकाळी 7 ते साडे सातला पुन्हा कॉलवरून संपूर्ण माहिती अरुण राठोडकडून घेतली आणि पोलिसांना दिली. तो कॉल पब्लिकमध्ये आणावा. सगळी इत्यंभूत माहिती देऊनही अॅक्शन का नाही. ज्या डॉक्टरांचा वार नव्हता, तो का आला? त्याने पूजाला ट्रीटमेंट का दिली? त्यांनी सांगितले. पुणे पोलिसांनी कोणतीही मदत मागितली नाही, सांगितले नाही. तपास केला आणि निघून गेले. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी, अरुणच्या घरी चोरी व्हावी केवढे योगायोग आहे बघा.