शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:11 PM2019-09-28T13:11:40+5:302019-09-28T13:20:21+5:30

'पवारांच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये रस नाही'

on day will be CM Post to Shiv Sena, Uddhav Thackeray | शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिल्याप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा इशारा दिला आहे. मुंबईत रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसल्याशिवाय राहणार नाही, असे वचन दिले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, युतीबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी आमचे बोलणे झाले असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे....
- तमाम शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. रंगशारदा मध्ये भेटल्याशिवाय निवडणूक असल्यासारखे वाटत नाही. 
- राजकीय भाषणंपेक्षा मी तुमच्याशी कौटुंबिक भाषण करणार आहे. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात. 
- शिवसैनिक प्रमुखांनी माझ्याकडे तुमच्यासारखे सोबती दिलेल्या आहेत असे  जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत. 
- माझा तर पक्षच पितृपक्ष आहे. पूर्वजांची आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का ? 
- पूर्वजांची पुण्याई माझ्या मागे आहे म्हणून माझ्या मागे इतक्या लोकांचे प्रेम आहे. 
-  महाराष्ट्रात बरीच संकटे येतात जसे पूर वगैरे पण माझे शिवसैनिक स्वतःला झोकून देऊन त्यामध्ये काम करत असतात. शेवटी मला दम द्यावा लागतो की बाबा जरा आराम कर. 
- मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाहीत. 
- जो आपल्या कर्माने मरणार आहे तर त्यांना धर्माने मारू नका.


-  कोणी जर सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही.
- शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टा समोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी न्यायमूर्तींना विचारले सांगा माझा गुन्हा काय ? 
- १९९२-९३ साली झालेल्या दंगलीमध्ये  हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा आहे का ? 
-  तुमच्यासारख्या मर्दानी आज हिंदूंचे रक्षण केले. 
- मला यावेळी विधानसभेत सत्ता हवी आहे. 
- मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. 
- गेली पाच वर्षे संघर्षाची होती त्यामध्ये तुम्ही माझ्या नेहमीसोबत राहिलात यासाठी सुद्धा आभार मानण्यासाठी मी तुम्हाला बोलवले आहे.
- नंदकुमार यांनी रक्ताने लिहिले होते की, मी मेलो तरी भगवा सोडणार नाही. असे शिवसैनिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेसोबत लढत आहेत.
- शेतकऱ्यांना फक्त मी कर्ज मुक्तच नाही तर पूर्ण चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. - सर्व इच्छुकांना सांगत आहे की, एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसल्याशिवाय राहणार नाही असे मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलेले आहे. 
- हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे.
- युतीची घोषणा लवकरच होईल.
-  वैर केलं तर आम्ही उघडपणे करतो आणि जर यूती केली तर आम्ही पाठीमागून सुरा मारत नाही अशी आमची अवलाद नाही.
- तुझं आयुष्य बदलणार जर कोणत्या  खड्या मध्ये जर ताकत असेल तर तुझ्यासारख्या जिवंत माणसांमध्ये की ताकत असेल. 
- शिवसेनेची स्थापना ही कोणताही मुहूर्त किंवा काळ वेळ बघून झाली नाही.
- प्रत्येक मतदार संघामध्ये मला शिवसेना पाहिजे. 
- युती झाली तर जिथे भाजप असेल तर आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी. 
- शेतकरी आणि गोरगरिबांची प्रश्नाने सोडवायचे असतील तर एकत्रित पणे काम करावे लागेल. 
- ज्या जागा आपल्या वाट्याला येतील तिथे आपली निवडणुकीची तयारी झालेली असली पाहिजे. 
-  जर माझे शिवसैनिक माझ्या सोबत असतील आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे तर मला हवा तसा टर्न मी मारीन.
- आम्ही शिवरायांचे मावळे आहोत कपट कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमासाठी  आहे. 
- शिवरायांनी सुद्धा विचारले आहे की, मी मित्रांना दगा दिल्याचे उदाहरण दाखवा.
-  मला हात वर करून वचन द्या की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू. 
-  निवडणुकीसाठी उमेदवार निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो.
-  मी म्हणजे भगवा मी म्हणजे शिवसेना हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न करा.

Web Title: on day will be CM Post to Shiv Sena, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.