सोशल मीडियावर डेज्च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच
By admin | Published: February 9, 2015 10:37 PM2015-02-09T22:37:11+5:302015-02-09T22:37:11+5:30
व्हॅलेंटाइन डे आणि कॉलेजमध्ये साज-या होणा-या विविध डेजच्यानिमित्ताने मित्र - मैत्रिणी आणि आवडत्या व्यक्तीला ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे.
पूनम गुरव, नवी मुंबई
व्हॅलेंटाइन डे आणि कॉलेजमध्ये साज-या होणा-या विविध डेजच्यानिमित्ताने मित्र - मैत्रिणी आणि आवडत्या व्यक्तीला ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमुळे तरूणाईसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अॅप्समुळे विविध प्रकारचे ग्रीटिंग्ज आणि मेसेज प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविता येत आहेत. सध्या अशाच सर्व सोशल नेटवर्र्किं ग साईटवर वेगवेगळ्या डेज्च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.
सध्याचा तरुणवर्ग हा टेक्नोलॉजीशी जोडला गेला असल्याने एका क्लिकवर जगभरातील माहिती गोळा करू शकतो. अशाच सोशल नेटवर्किंग साईटवर सध्या व्हॅलेंटाईनबरोबर विविध डेजच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. स्मार्ट फोनमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील मित्र-मैत्रिणींशी जोडणे शक्य झाले आहे. एकमेकांपासून दूर असलेल्या प्रिय व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे एक चांगले माध्यम ठरले आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात विविध डेज्नुसार दररोज एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे शक्य होत नाही. अशा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया या पर्यायाची निवड सहजशक्य होत आहे.
व्हॉट्सअपच्या सहाय्याने आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मित्र- मैत्रिणींना एसएमएस किंवा प्रेमाचे प्रतीक असलेले विविध फोटो पोस्ट केले जात आहेत. वर्षभरात प्रियजनांसोबत साजरे केलेले काही खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून एकमेकांना शेअर केले जात आहेत. मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या गिफ्ट्ससोबत सेल्फी काढून स्वत:च्या आवडीचे किंवा गायलेले गाणे त्या प्रियजनांना ऐकविले जाते.
फेसबुक या सोशल साइटवर एकाच वेळी हजारो मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येत असल्याने सध्या व्हॅलेंटाइन डेजचे प्लॅनिंग जोरदार सुरू आहे. विविध डेज्ची माहिती स्टेटस्च्या माध्यमातून दिली जात आहे. त्याचबरोबर व्हॅलेन्टाइन डे निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती इव्हेंट या पर्यायाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. याद्वारे फेसबुक मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केले जात आहे. डेज्नुसार प्रत्येक जण दररोज स्टेटस् चेंजबरोबर डेजचे फोटो शेअर करत आहेत, त्याचबरोबर ्ट्विटर आणि ई-मेलच्या माध्यमातूनही डेज्नुसार एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.