Join us

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 06:20 IST

महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मोदींनी बुधवारी कल्याण येथे जाहीर सभा घेतली. या सभेवेळीही तसेच त्यापूर्वी कल्याणमध्ये आगमन झालेल्या मोदींच्या स्वागतासाठीही अजित पवार गैरहजर होते. 

सायंकाळी पंतप्रधान मोदींचा उत्तर-पूर्व मुंबईत रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोमध्ये महायुतीमधील शिंदे सेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते. मात्र अजित पवार या रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे अजित पवार कुठे आहेत, ते मोदींच्या दौऱ्यावेळी गैरहजर का होते अशी चर्चा सुरू झाली आहे. 

 

टॅग्स :अजित पवारनरेंद्र मोदीमुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४