Join us

मानखुर्दच्या सबवेमधील पाण्यात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:30 AM

मुंबई : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह मानखुर्दच्या सबवेमधील पाण्यात सापडला आहे.

मुंबई : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह मानखुर्दच्या सबवेमधील पाण्यात सापडला आहे. आशिष पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. प्राथमिक तपासात हत्या झाल्याचा संशय नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.महाराष्ट्रनगर परिसरात पवार हा कुटुंबीयांसोबत राहतो. १८ नोव्हेंबर रोजी तो कामानिमित्त घराबाहेर पडला. दोन दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सोमवारी ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याप्रकरणी नोंद केली. शोध सुरू असतानाच मंगळवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह सबवेच्या पाण्यात तरंगत असल्याची माहिती रिक्षाचालकाकडून पोलीस नियंत्रण कक्षास मिळाली. घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलीस तेथे दाखल झाले. याबाबत अधिक चौकशी केली असता तो पवारचा मृतदेह असल्याचे समोर आले. मानखुर्द येथील सबवे पावसाच्या पाण्याने भरल्याने येथून कोणीही ये - जा करीत नव्हते.

टॅग्स :मृत्यू