सहकारी संस्थांना लेखा परीक्षण अहवालासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 07:16 AM2020-12-21T07:16:46+5:302020-12-21T07:17:03+5:30

co-operative societies : संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी, यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Deadline for co-operative societies for audit report till 31st December | सहकारी संस्थांना लेखा परीक्षण अहवालासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

सहकारी संस्थांना लेखा परीक्षण अहवालासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

Next

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थेचे २०१९-२० या कालावधीचे लेखा परीक्षण अहवाल दाखल करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवाय २०१९-२० या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी ३१ मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी, यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पूर्व उपनगरे यांच्या कार्यालयांतर्गत घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पवईसह मुलुंड हे पाच विभाग येतात. 
या पाच विभागांत येणाऱ्या सर्व संस्थांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांना संस्था नोंदणीनंतर ४ महिन्यांच्या आत जमिनीचे मानिव अभिहस्तांतरण करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे सादर करणे शक्य
संस्थांना कायद्यान्वये सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेकडे अभिहस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करता येतील. शिल्लक चटई, पुनर्विकास व क्षेत्रवापरासाठी संस्थेच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे

Web Title: Deadline for co-operative societies for audit report till 31st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई